Red Food for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बाजारात कित्येक उत्पादने उपलब्ध आहेत. जिममध्ये घाम गाळून, उपाशी राहून अनेकजण बारीक होण्याच्या मोहिमेवर असतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या व्यायामाच्या इतकाच किमबहून त्याहून अधिक तुमचा आहार कसा आहे हे महत्त्वाचे ठरते. आहार नियंत्रणात व सकस असेल तर अर्ध काम तिथेच झालं म्हणून समजा. असं म्हणतात की आहारात जितके जास्त रंग असतील तितकं अधिक पोषण शरीराला मिळतं. त्यातही जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर लाल रंग तुमच्या आहारात मुबलक प्रमाणात असायलाच हवा. वेट लॉसच्या डाएटसाठी कोणते पाच लाल पदार्थ तुम्ही नियमित सेवन करू शकता जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अनेकजण बारीक होण्यासाठी उपाशी राहण्याचा प्रकार करतात पण असे करणे वजन वाढवण्यासच कारण ठरते. यामुळे शरीरात पोषक तत्व कमी होतात व उलट पित्ताचा त्रास वाढू लागतो. आपण आज जे पदार्थ पाहणार आहोत ते तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा ठरवून नियमित आहारात नक्की समाविष्ट करू शकता.

Cooking Tips: कॉफी बीन्स शिवाय बनवा कॉफी पावडर; कॅफिनचं व्यसन हटवायचं तर ‘ही’ रेसिपी करा ट्राय

सफरचंद

एक सफरचंद तुम्हाला सर्व आजारांपासून दूर ठेवू शकतो अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. सफरचंद आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा गुणकारी आहे. एका माध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये ५० ते ७० कॅलरीज असतात व ४. ४ ग्राम फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते व त्यामुळे शरीरातील अनावश्यक घटक कमी होऊन वजन नियंत्रणात राहते.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीचा सीझन आता लवकरच सुरु होईल. स्ट्रॉबेरी मध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. शरीराला सूज येणे, रक्तातील साखर अनियंत्रित होणे, हृदयाचे विकार अशा विविध समस्यांवर स्ट्रॉबेरीचे सेवन फायदेशीर ठरते. आरोग्यतज्ज्ञ नियमित ३ ते ४ स्ट्रॉबेरी खाण्याचा सल्ला देतात.

टोमॅटो

टोमॅटोसुद्धा फायबरचा मोठा खजिना आहे. एक टोमॅटो खाल्ल्यावर आपल्याला बराच वेळ पोट भरलेले राहते. शिवाय कॅलरीज बर्न करण्यासाठीही टोमॅटो मदत करतो. अंड्यांच्या माहितीनुसार एक १०० ग्रॅम टोमॅटोचे सेवन १९ कॅलरीज कमी करते त्यामुळे टोमॅटो हा वजन घटवण्याच्या डाएटमध्ये आवर्जून समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

बीट

रक्त वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या बीटमध्ये फायबरसुद्धा भरपूर असते. यातील अँटी इन्फ्लेमेंटरी सत्वांमुळे वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे शरीराला वारंवार सूज येण्याची समस्या सुद्धा कमी होते.

लाल मिरची

वजन घटवण्यासाठी लाल मिरचीचा फायदा होतो ही माहिती थोडी चक्रावणारी असू शकते, पण ,तज्ज्ञांच्या माहितीनुसार मिरची शरीरातील कॅलरीज बर्न करण्यासाठी खूप मदत करते. मिरचीतील सत्व चयापचय क्रिया सुधारतात व त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मात्र मिरचीचे सेवन काळजीपूर्वक करावे अन्यथा यामुळे पित्ताचा त्रास उद्भवू शकतो, दिवसाला तीन मिरच्या खाणे उचित ठरेल, पण मिरची नेहमी ताजी असेल याची काळजी घ्या. मिरची पावडरचे सेवन शक्य तेवढे टाळा.