लठ्ठपणा ही सध्या अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. त्यातही पोटोचा वाढता घेर काही केल्या कमी होत नाही अशी तक्रार अनेक स्त्रिया आणि पुरुषही सातत्याने करताना दिसतात. तुमच्या दिसण्यामध्ये अडथळा ठरणारा हा पोटाचा घेर आरोग्यासाठीही तितकाच धोकादायक ठरु शकतो. ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम करावे लागत असल्याने हा घेर वाढत जातो. मग यावर काय उपाय करता येईल असा विचार अनेक जण करत असतात. पोटाचा घेर कमी करायचा असल्यास योग्य डाएट आणि व्यायाम आवश्यक असतो. रोजच्या धावपळीत या व्यायामालाही वेळ नाही अशी अनेकांची तक्रार असते. पण रोजच्या धावपळीत काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास हा घेर कमी होण्यास निश्चितच मदत होते. पाहूयात हा घेर कमी करण्यासाठीच्या काही सोप्या टिप्स…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनाची तयारी करा

पोटाचा घेर कमी करण्यासाठी मनाची तयारी करणे अतिशय गरजेचे असते. पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच कॅलरीज जाळाव्या लागतील हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला डाएटमध्ये बदल करावा लागेल आणि त्यासाठी मनावर नियंत्रण असणे महत्त्वाचे आहे.

चांगला ट्रेनर शोधा

तुम्हाला कमी वेळात हा वाढलेला घेर कमी करायचा असेल तर तुम्ही एखादा चांगला मार्गदर्शक शोधणे गरजेचे आहे. तो तुम्हाला हा घेर कमी होण्यासाठी काही व्यायाम सांगेल. तसेच तुमच्या स्नायूंची क्षमता वाढण्यासाठीही तो मदत करेल.

चांगला आहार महत्त्वाचा

शरीरावरील चरबी वाढण्यामध्ये आपल्या आहाराचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळे जंक फूड खाणे टाळावे. पण दुसरीकडे पोटाच्या स्नायूंची ताकद वाढण्यासाठी बदाम, फायबर आणि मॅग्नेशियम असलेला आहार घ्यावा. याबरोबरच अन्नाचे चांगले पचन होण्यासाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिडचाही आहारात समावेश करावा.

जीवनशैलीत बदल करा

सतत एका ठिकाणी बसून राहण्याचे काम असेल तर पोटाचा घेर वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाच्या मधे एखादी चक्कर मारा. जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, ताण यांमुळेही शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टी योग्य पद्धतीने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weight loss how to reduce belly fat in less time easy tips
Show comments