Water Melon Diet Facts: उन्हाळ्याचे दिवस आणि कलिंगडाचे सेवन हे एक ठरलेले समीकरण आहे. आपल्यापैकी बहुतांश लोकांना आंबा खूप आवडत असेल पण कलिंगड हे सुद्धा विशेष प्रेम असते. या कलिंगडाचे एक रसाळ आणि ट्रेंडी डाएट सध्या खूप चर्चेत आहे. आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञ अवनी कौल यांनी सांगितले हेल्थशॉट्सला सांगितले की, कोणतेही डाएट करण्यापूर्वी तुमचा त्या डाएटवर किती विश्वास आहे हे महत्त्वाचे आहे. सर्वात आधी कलिंगडाचे फायदे काय आहेत, हे कलिंगड डाएट काय आहे आणि ते तुमच्यासाठी किती योग्य आहेत हे पाहूया…
कलिंगडाचे फायदे काय (Benefits Of Watermelon)
1) वजन कमी होणे
कलिंगड हे रसाळ फळ आहे. यात कमी-कॅलरी असतात. याचा अर्थ असा आहे की आपण जास्त कॅलरी न घेता त्याचा मोठ्या प्रमाणात कलिंगडाचे सेवन करू शकता. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते व पोर्शन कंट्रोलला मदत होईल.
2) हायड्रेशन
उन्हाळयात शरीराला पाण्याची गरज असते. कलिंगड हे हे प्रामुख्याने पाण्याने बनलेले असते, याचा अर्थ ते तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास मदत करू शकते. गरम हवामानात किंवा तुम्ही व्यायाम करून झाल्यावर कलिंगड खाणे उपयुक्त ठरू शकते.
3) पोषण सत्व
कलिंगडात व्हिटॅमिन ए आणि सी असतात तसेच पोटॅशियमचा हा एक चांगला स्रोत आहे, जे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करू शकते, निरोगी त्वचा जपता येऊ शकते आणि तुमचा रक्तदाब नियंत्रित होऊ शकतो.
4) डिटॉक्सिफिकेशन
कलिंगडामुळे लघवीचे प्रमाण वाढते व शरीरातील अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करू शकतात. यामुळे पोट फुगणे कमी होऊ शकते व आपले पचन सुधारू शकते
कलिंगड डाएट काय आहे? (What Is Water Melon Diet)
या डाएटमध्ये तुम्हाला विविध स्वरूपात कलिंगडाचे सेवन करायचे असते. यात तुम्ही अन्य गोष्टी सुद्धा मिक्स करून खाऊ शकता पण सर्व आहारातील मुख्य घटक हे कलिंगडच असायला हवे.
हे ही वाचा<< एका नजरेत गोड कलिंगड कसे ओळखाल? न कापता, न चाखता भेसळीची ‘ही’ सहा चिन्हे आधी ओळखा
कलिंगड डाएट तुमच्यासाठी योग्य आहे का? (Is Water Melon Diet Good For You)
फायदे मिळवायचे असल्यास कलिंगडाचे डाएट हे फार कमी दिवसांसाठी (१ ते २ दिवस) करायला हवे. आहारतज्ज्ञ कौल म्हणतात, कलिंगडामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक सत्वे असतात, परंतु प्रत्यक्षात त्यात ९०% पेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे कलिंगडाचा अधिक वापर हा शरीराला डिटॉक्स करण्यास मदत होते. तुमच्या शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषकसत्वे मिळत आहेत का याची खात्री करण्यासाठी इतर फळे आणि भाज्यांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही हे डाएट करण्याचा विचार करत असाल तर एकदा तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.