Viral News : चुकीच्या लाइफस्टाईलमुळे अनेक जणांचे वजन वाढते. हल्ली वजनवाढ ही खूप मोठी समस्या झाली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वाट्टेल ते प्रयत्न करतात; पण अनेकदा त्याचा काहीही फायदा होत नाही. पण आज आपण अशा तरुणीविषयी जाणून घेणार आहोत की, जिने फक्त १० महिन्यांत तब्बल ५२ किलो वजन कमी केले आहे. प्रतिमा लोकवानी असे या मुलीचे नाव आहे.
प्रतिमाचे १० महिन्यांपूर्वी ११२ किलो वजन होते. इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने शेअर केलेल्या काही पोस्टमध्ये ती सांगते की, आधी तिला लोक अतिवजनामुळे खूप चिडवायचे; पण नंतर तिने स्ट्रिक्ट डाएट फॉलो केला आणि फक्त १० महिन्यांत वजन कमी केले.
अनेक लोकांचा असा समज आहे की, जिममध्ये गेल्यानंतरच वजन कमी होते; पण प्रतिमाने जिममध्ये न जाता डाएट फॉलो करून ५२ किलो वजन कमी केले आहे. आपल्या लाइफस्टाईलमध्ये थोडा बदल केला की वजन कमी होते, हे तिने सिद्ध केले आहे.
हेही वाचा : पावसाळ्यात चिमुकल्यांनी घरीच घेतला आजीच्या हातच्या पाणीपुरीचा आस्वाद; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…
प्रतिमाची प्रेरणादायक स्टोरी
प्रतिमा लोकवानी ही मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथे राहणारी आहे. ५२ किलो वजन कमी केल्यानंतर आता प्रतिमाचे वजन ६० किलोच्या जवळपास आहे. प्रतिमाचा हा फिटनेस प्रवास पाहून अनेक लोक प्रभावित झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रतिमा लहानपणापासून खूप लठ्ठ होती. तिला खायला आवडायचे. बर्गर, पिझ्झा व जंक फूड ती आवडीने खायची. त्यामुळे दिवसेंदिवस तिचे वजन वाढत होते. शाळेत असताना तिच्या वाढलेल्या वजनावर अनेक जण तिला चिडवायचे. याशिवाय लठ्ठपणामुळे तिला अनेकदा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला.
एक दिवस प्रतिमाने ठरविले की, स्ट्रिक्ट डाएट फॉलो करायचा आणि वजन कमी करायचे. त्यानंतर जिमला न जाता, प्रतिमाने फक्त १० महिन्यांमध्ये वजन कमी केले.
हेही वाचा : Viral Video : एक वर्षाच्या चिमुकल्याने केली २४ सेकंदापर्यंत डेड हँगिंग एक्सरसाइज, पाहा व्हिडीओ
प्रतिमाने कसे केले वजन कमी?
प्रतिमाने वजन कमी करण्यासाठी नियमितपणे घरचे जेवण सुरू केले. ती लिमिटमध्ये खायची. बाहेरचे खाणे तिने बंद केले. एवढेच काय तर जंक फूडसुद्धा बंद केले आणि फायबर व प्रोटिनची मात्रा वाढवली.
प्रतिमाने पिझ्झा, आइस्क्रीम, पॅन केक, पाणीपुरीसारखे आवडीचे पदार्थ खाणे तिने बंद केले नाही; पण हे सर्व ती लिमिटमध्ये खाते. प्रतिमा नाश्त्यामध्ये ब्रेड आम्लेट आणि दुपारच्या जेवणात पोळी-भाजी, वरणभात खाते. सायंकाळी मखाणे आणि ड्रायफ्रूट्स खाते; तर रात्री पोळी-भाजी खाते. प्रतिमाने वजन कमी करताना १० महिने एक्सरसाइज केले नाही; पण आता ती जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करते.