धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अनेकदा काही लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही परिणामी अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. वाढत्या आरोग्य समस्यांमुळे अनेकांनी आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या आपल्या आजूबाजूला अनेकांचा वजन कमी करण्यावर जोर दिसतो. काहींना वजन कमी करणं अगदी सहज जमतं, तर काहींसाठी वजन कमी करणं म्हणजे परीक्षा असते. मात्र व्यायामाने तुम्ही वजन नक्कीच कमी करू शकता आणि आपल्या आवडत्या ड्रेसमध्ये पुन्हा एकदा स्वतःला बघू शकता. मात्र, या व्यायामात सातत्य असणं फार गरजेचे आहे. दैनंदिन जीवनात व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायामामुळे अनेकांची आयुष्य बदलली आहेत. वजन कमी करण्याची अशीच प्रेरणादायी गोष्ट तनुश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सांगितली आहे. त्यात तिने घरच्या घरी कोणत्याची उपकरणांशिवाय तब्बल ३७ किलो वजन कमी केल्याचे सांगितले आहे. सध्या तिचे वजन ४८ किलो असल्याचे तिने सांगितले आहे. तिचा संपूर्ण प्रवास तिच्या इंस्टाग्रामवर तिने शेअर केला आहे.
तनुश्रीने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियोवर पोस्ट केली, ज्यामध्ये तिने घरच्या घरी ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यासाठीचे व्यायाम साधे असू शकतात आणि त्यासाठी विशेष उपकरणांची, मशिनची गरज नसते.
तनुश्री इंस्टाग्रामवर सक्रिय असून ती नियमितपणे तिचा वजन कमी करण्याचा अनुभव, घरगुती व्यायाम पद्धती आणि आरोग्यविषयक टिप्स शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने घरच्या घरी व्यायाम करा आणि आपले वजन कमी करा असे कॅप्शन देत उपयुक्त अशा टिप्स सांगितल्या आहेत.
वजन कमी करण्यासाठी तनुश्रीने सांगितलेल्या टिप्स
१. रोज जास्तीत जास्त चाला
पहिली टिप तिने दिली आहे की, रोज किमान ३० मिनिटे चालले पाहिजे. सुरूवातीला तुम्ही १५ मिनिटे सकाळी आणि १५ मिनिटे दुपारी असे चालायला सुरू करू शकता.
२. प्रथिने आणि फायबर पदार्थांचा आहार
दुसऱ्या टिपमध्ये ती सांगते, तुमच्या आहारात प्रथिने आणि तंतुमय पदार्थ अर्थातच फायबरचा समावेश संतुलित पद्धतीत असायला हवा.
३. भरपूर पाणी प्या
शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य पातळीत राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. मेटाबोलिसमचे योग्य प्रमाणात असण्यासाठी दिवसातून ३ लिटर पाण्याचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे.
४. वजन कमी करण्यासाठी व्यायाम
तनुश्री वजन कमी करण्यासाठी घरगुती व्यायामांचा पर्याय देते. भरलेल्या पाण्याच्या बाटल्या उचलणे, पुस्तकांची बॅग उचलणे, धान्यांची पोती उचलणे, अशा काही सोप्या पर्यायांची तिने माहिती दिली आहे. या गोष्टींनी तुम्ही घरच्या घरी व्यायाम करून वजन कमी करू शकतात.
५. रात्रीचे जेवण लवकर घ्या
संध्याकाळचे जेवण हे शक्यतो ७ वाजेपर्यंत करावे. त्यामुळे पचनक्रिया सुकर होते आणि वजन अनियमित वाढणे अटोक्यात येते.