Weight Loss : सध्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. त्यामुळे दिवसेंदिवस वजन वाढीच्या समस्या वाढताना दिसत आहेत. अनेक जण वजन कमी करण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात, पण काहीही फायदा होत नाही. पण, आज आपण काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे वजन कमी करता येऊ शकते.
न्यूट्रिशन आणि वेलनेस कन्सल्टंट नेहा सहाया यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी वजन कमी करण्यासाठी काही प्रभावी सोपे उपाय सांगितले आहेत.
त्या व्हिडीओमध्ये सांगतात…
१. जेवणाच्या २० मिनिटांपूर्वी आणि नंतर पाणी प्यावे. जर तुम्ही नाश्ता करत असाल तरी २० मिनिटांपूर्वी पाणी प्यावे.
२. दुपारच्या जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर १५ मिनिटे शतपावली करावी.
३. नियमित १० पुश अप्स आणि १० सिट अप्स करावे.
४. जेवणापूर्वी मुळा, गाजर, बीट, काकडी खावी.
५. जर तुम्हाला गोड खायची सवय असेल तर तुम्ही स्ट्रॉबेरी, खजूर आणि चॉकलेट सॉस खाऊ शकता.
nehasahaya या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नेहा सहाया यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वजन कमी करायचासुद्धा तुम्हाला आळस येतो, तर या सोप्या टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या टिप्समुळे तुमचा मुडसुद्धा सुधारू शकतो आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळू शकते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप चांगली माहिती दिली”, तर एका युजरने लिहिलेय, “या टिप्स खूप सोप्या आहेत.”