मधुमेह हा एक सामान्य आजार बनत चालला आहे. ज्याच्या रुग्णांची संख्या देशात आणि जगात झपाट्याने वाढत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे हा आजार होतो. मधुमेहाच्या आजारात स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती कमी करते किंवा थांबवते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे याला हायपरग्लाइसेमिया म्हणतात. रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ वाढल्याने शरीरातील अनेक अवयव खराब होऊ लागतात. मधुमेह जसजसा वाढत जातो, तसतसे हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचे नुकसान होतेच पण त्वचेवरही त्याचा परिणाम होतो.
मधुमेही रुग्णांमध्ये जेव्हा साखरेची पातळी २००mg/dL पेक्षा जास्त होते, तेव्हा त्याचा परिणाम हातांवरही दिसू लागतो. साखर वाढल्याने हातांमध्ये असह्य वेदना होण्याच्या तक्रारी वाढू शकतात. हातामध्ये जडपणा येतो, हाताच्या स्नायूंमध्ये वेदना होतात. बोटांमध्ये असह्य वेदना होतात. सकाळी हा त्रास जास्त होतो. शुगर लेव्हल २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यावर मधुमेही रुग्णांच्या हातात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेऊया.
( हे ही वाचा: Food Stuck in Throat: जेवताना तुमचाही घशात अचानक अन्न अडकते का? परिस्थिती गंभीर होण्याआधी लगेच करा ‘या’ ४ गोष्टी)
बोटांमध्ये कडकपणा येणे
रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास हाताच्या बोटांमध्ये कडकपणा येतो. कडकपणा इतका वाढतो की बोटे वाकणेही कठीण होते. सकाळी हाताची बोटे दुखत आहेत आणि अंगठ्यापर्यंत वाकणे कठीण होत आहे, मग समजून घ्या की रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे.
हाताच्या तळव्याला खाज येणे
साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेही रुग्णांच्या हाताच्या तळव्याला तीव्र खाज सुटण्याची समस्या उद्भवते. हातांची त्वचा कोरडी पडू लागते आणि हातावर खवले दिसू लागतात. हाताला जास्त खाज येणे हे मधुमेह होण्याचे लक्षण असू शकते.
( हे ही वाचा: दुधासोबत ‘या’ एका गोष्टीचे सेवन केल्यास शरीराला मिळतात ५ आश्चर्यकारिक फायदे; जाणून घ्या याचे सेवन कसे करावे)
नखे खराब होणे आणि त्याभोवती सूज येणे
वाढलेल्या साखरेचा परिणाम नखांच्या क्यूटिकलवर प्रथम दिसून येतो. जसजसा मधुमेह वाढत जातो तसतसे नखांभोवती सूज येऊ लागते. नखांचा रंग खराब होऊ लागतो. नखे पिवळ्या किंवा काळ्या रंगाची होतात. त्यामुळे नखे खराब दिसू लागतात.