– डॉ. मनीष दोशी
मुंबईमध्ये सध्या कोविड-19ची चाचणी करण्याची क्षमता वाढवली जात आहे आणि त्यासाठी मोठ्या संख्येने रॅपिड अँटिजेन किट्स खरेदी केली जात आहेत. पण या टेस्ट नेमक्या काय आहेत आणि त्या संसर्ग झालेल्या रुग्णांवर कशा प्रकारे काम करतात? विषाणू यासारखे संसर्गजन्य घटक शरीरासाठी अनोळखी असतात. त्यांच्यामध्ये बाह्यभागात विशेष मॉलिक्युलर रचना असते, त्यास “अँटिजेन” असे म्हणतात. हे अँटिजेन प्रतिकारशक्तीला चालना देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा सामना करण्यासाठी विशिष्ट अँटिबॉडीची निर्मिती करतात. रॅपिड अँटिजेन टेस्ट ही रॅपिड इम्युनोक्रोमॅटोग्राफिक इम्युनोसे असते व त्यामुळे व्हायरल अँटिजेन शोधणे शक्य होते.
नॅसोफेरिंजिएल स्वॅब घेतला जातो आणि जेथे अँटिजेन एक्स्ट्रॅक्शन केले जाते अशा एक्स्ट्रॅक्शन बफर या सोल्यूशनमध्ये ठेवला जातो. कलेक्शन केल्यापासून एका तासाच्या आत, टेस्टिंग किटवर काही थेंब टाकले जातात. विषाणूशी संबंधित अँटिबॉडीज त्यावर ठेवल्या जातात. पूरक अँटिजेन आढळला तर निकाल पॉझिटिव्ह समजला जातो, दोन रेषा दाखवल्या जातात – एक रेष नियंत्रणासाठी व दुसर टेस्टसाठी. नियंत्रण या भागात केवळ एकच रेष दिसून आली तर टेस्ट निगेटिव्ह असते; परंतु, टेस्ट भागात एक रेष दिसून आली आणि नियंत्रण या भागात नसली तर टेस्ट अवैध असल्याचे जाहीर केले जाते. याचा निकाल 15-30 मिनिटांत मिळू शकतो.
ICMR ने प्रामुख्याने दोन क्षेत्रांत रॅपिड अँटिजेन टेस्टची शिफारस केली आहे. पहिली शिफारस कंटेन्मेंट झोनमध्ये, सिम्प्टोमॅटिक इन्फ्लुएन्झा-लाइक इलनेस (आयएलआय), असिम्प्टोमॅटिक डायरेक्ट व कोमॉर्बिडिटीजशी धोकादायक संपर्क असणाऱ्या लोकांसाठी आहे. दुसरी शिफारस सिम्प्टोमॅटिक आयएलआय रुग्ण, असिम्प्टोमॅटिक हाय-रिस्क रुगण व एअरोसोल-जनरेटिंग उपचार घेणारे असिम्प्टोमॅटिक रुग्ण यांच्यासाठी आहे. रॅपिड अँटिजेन टेस्ट तुलनेने स्वस्त आहे आणि करण्यास सोपी आहे, यामुळे ती टेस्ट लोकप्रिय आहे. या टेस्टमुळे जलद चाचणी करणे शकय होते व त्यानंतर पॉझिटिव्ह सॅम्पलही तपासता येतात. ही टेस्ट हाती करता येत असल्याने त्यासाठी प्रयोगशाळेतल्या वेगळ्या उपकरणाची गरज नसते, जशी RT-PCR साठी लागते. याउलट, रॅपिड अँटिजेन टेस्ट या RT-PCR टेस्टसारख्या वेळखाऊ टेस्टसाठी लागणारा वेळ वाचवतात.
या लाभांव्यतिरिक्त, RT-PCR ही गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे. रॅपिड अँटिजेन टेस्टची स्पेसिफिसिटी 99.3% – 100% इतकी उच्च आहे, परंतु तुलनेने संवेदनशीलता 55% – 85% इतकी कमी आहे, याचाच अर्थ, या टेस्टमधून चुकीचे निगेटिव्ह निकाल दाखवले जाऊ शकतात. म्हणूनच, लक्षणे दिसून येणाऱ्या किंवा विषाणूशी संपर्क आला आहे परंतु रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये निगेटिव्ह आलेल्या संशयित व्यक्तीने दोन दिवसांच्या आत RT-PCR टेस्ट करून घेणे गरजेचे आहे.
(लेखक खार येथील हिंदूजा हॉस्पिटल, पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत)