World Blood Donor Day 2021 : १४ जून रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. दुसऱ्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी रक्तदान करणं खूप आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटनेने या दिवसाला रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. वर्ष २००४ मध्ये या दिवसाची स्थापना लोकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यासाठी केली होती. या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये रक्तदान करण्याची जनजागृती निर्माण करण्यासाठी आहे. रक्तदान केल्यामुळे तमुच्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसंच हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. रक्तात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हृदय विकाराचा धोका वाढू शकतो. नियमितपणे रक्तदान केल्याने लोहाचे अतिरिक्त प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुदृढ राहतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेड सेल्स प्रोडक्शन

रक्तदान केल्यानंतर तुमचं शरीर रक्त पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत असतं. यामुळे शरीराच्या पेशी जास्तीत जास्त लाल रक्त पेशींच्या निर्माण करण्यासाठी प्रेरित होत असतात. ज्यामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते आणि शरीराला उत्तम प्रकारे काम करण्यास मदत मिळते.

वजन नियंत्रणात राहतं

रक्तदान कॅलरी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करु शकतं. लाल रक्तपेशींचे प्रमाण पुढील काही महिन्यात बरोबर राहतं. याचदरम्यान सकस आहार आणि नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. रक्तदानाला वजन कमी करण्याचा मार्ग म्हणता येणार नाही. हे फक्त चांगल्या आरोग्याचं माध्यम आहे. वजन कमी करण्याच्या प्लॅनचा भाग नाही. परंतु रक्तदानामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

नक्की वाचा – World Blood Donor Day 2023 : कोणताही व्यक्ती किती रक्तदान करू शकतो? किती दिवसात होते रिकव्हरी? जाणून घ्या

कर्करोगाचा धोका कमी

रक्तदान नियमितपणे केल्यावर तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेऊ शकता. यामुळे कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. रक्तदान केल्यामुळे रक्त पातळ होतं, ज्यामुळे हृदयाचं आरोग्यात सुधारणा होते. अनेक रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली आहे की, रक्तदान केल्यामुळे कर्करोग आणि अन्य रोगांचा धोका कमी होतो.

आरोग्य उत्तम राहतं

नियमितपणे रक्तदान केल्यावर शरीरातील पेशी प्रोत्साहित होतात. ज्यामुळे शरीरिक फिटनेसही सुधारतं आणि रक्तस्त्राव नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते. तसंच रक्तदान केल्यामुळे शरीरातून टॉक्सिन बाहेर फेकलं जातं. यामुळे रक्तदाताच्या बोनमेरो नवीन लाल पेशी निर्माण करतो. नवीन लाल पेशी निर्माण झाल्याने शरीर निरोगी राहतं.

हेल्थ चेकअप

आरोग्याला होणाऱ्या या फायद्यांशिवाय रक्तदानाच्या प्रक्रियेत रक्तदान करण्याआधी तुमचं रक्त आणि ओरोग्याची निशुल्क तपासणी केली जाते. रक्ताची तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्ती रक्तदान करण्यासाठी पात्र आहे की नाही याबाबत माहित होतं. त्यामुळे रक्तदान केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची तपासणीही करता येते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the 6 biggest health benefits of blood donating world blood donor day blood donation latest news nss