Luke warm water with ghee : निरोगी राहण्यासाठी, आरोग्यज्ज्ञ सहसा कोमट पाण्याने दिवसाची सुरुवात करण्याचा सल्ला देतात. अनेक अभिनेत्री दिवसाची सुरुवात तुपाच्या सेवनाने करतात कारण तुपामुळे पोट, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. याशिवाय कोमट पाणी पिण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. त्याबरोबर कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचेही काही फायदे आहे. याबाबत आम्ही फायदे सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही नक्कीच करून पाहावा, पण असे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
इंडियान एक्सप्रेसला माहिती देताना, गुरुग्रामच्या नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ज्ञ परमीत कौर यांनी सांगितले की, “सकाळी गरम पाणी आणि एक चमचा तूप घेणे आवश्यक आहे. गरम पाण्यात तूप खाल्ल्याने पचनसंस्थेला चालना मिळण्यास मदत होते कारण ते नैसर्गिक रेचक (मलोत्सर्जनासाठी मदत करते) म्हणून काम करणारे असून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. हे आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे आणि शरीरातील विषारी घटक सुरळीतपणे काढून टाकण्यास मदत करते, पचनक्रिया सुधारते. तूप कॅल्शियम आणि अमीनो ऍसिडमध्ये समृद्ध आहे, जे हाडे आणि दातांचे आरोग्य मजबूत करण्यास देखील मदत करते,”
कोमट पाण्यात तूप टाकून पिण्याचे काय फायदे आहेत?
१) सकाळी कोमट पाण्यात तूप मिसळून प्यायल्याने हाडे मजबूत होतात. तसेच सांधेदुखीपासून आराम मिळतो.
२) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास शरीरात साचलेले टाकाऊ पदार्थ अथवा विषारी घटक बाहेर पडतात. डिटॉक्ससाठीही तुपाचे सेवन खूप चांगले मानले जाते
३) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास त्वचा उजळ होते. तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा टिकवून राहण्यास मदत करते.
४) कोमट पाण्यात तूप टाकून प्यायल्यास तुमचे चयापचय वाढवते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी कोमट तूप प्यायल्याने वजन लवकर कमी होते. त्यामुळे तुमची साखरेची पातळीही सुधारते.
५) तुपातील पोषक तत्वे – तुपात ओमेगा-३, ओमेगा-९, फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन ए, के, ई यांसारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय देशी तुपात व्हिटॅमिन-ए, सी आणि ब्युटीरिक अॅसिड असते. हे सर्व घटक तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
(टिप- लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)