आपण सगळ्यांनी शाळेत आणि घरी दोरी उड्या हा खेळ खूप खेळलो आहोत. तसेच अनेकजण शारीरिकदृष्ट्या तंदूरस्त राहण्यासाठी सकाळी सकाळी दोरीउड्या मारत असतात. पण आजकालच्या लहान मुलांना पहिलं तर कोणीच दोरीउड्या हा खेळ खेळताना दिसत नाही. हे सगळे इनडोअर गेम्स आणि मोबाईलमध्ये व्यस्त असल्याच आपल्याला पहिला मिळतय. पण तरीही तुम्हाला उद्यानांमध्ये आणि जिममध्ये फिटनेससाठी बरेच तरुण मंडळी उडी मारताना दिसतात.
वास्तविक पाहता जेव्हा तुम्ही लहानपणी दोरी उड्या मारायचा. तेव्हा तुम्ही फक्त एक खेळ म्हणून त्याचा आनंद घ्यायचा. आपल्याला लहानपणी हे माहीत नव्हतं की, दोरी उड्या मारणे हा खेळ देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण आजही असे बरेच लोकं आहेत ज्यांना दोरी उडी मारण्याच्या फायद्यांविषयी माहिती नाही. तर दोरी उड्या मारण्याचे काय फायदे आहेत आणि या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जाणून घेऊयात.
दोरी उड्या मारण्याचे फायदे
दोरी उड्या मारल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी नियमितपणे तुम्ही पंधरा ते वीस मिनिटे दोरी उड्या मारल्या पाहिजे.
नियमितपणे दहा मिनिटे दोरी उड्या मारल्याने रक्ताभिसरण सुधारते.
तुम्ही जर नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.
दोरी उड्या मारल्याने फुफ्फुसांना बळकटी मिळते आणि त्यांची क्षमता वाढवते.
नियमितपणे दोरी उड्या मारल्याने हृदयविकाराचा झटका आणि नैराश्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो.
दोरी उड्या मारल्याने मुलांची उंची वाढण्यास मदत होते.
तुम्ही दररोज नियमित दोरी उड्या मारल्या तर तुमची हाडे मजबूत होतील आणि संतुलनात लक्ष केंद्रित करते.
दोरी उड्या मारताना या गोष्टी लक्षात ठेवा
रिकाम्या पोटी दोरी उडी मारू नये, यामुळे पोटात वेदना होऊ शकतात.
जेवणानंतर ताबडतोब दोरी उड्या मारू नये, यासाठी जेवणानंतर दोन तासांचा वेळ ठेवा.
सर्वातआधी दोरी उड्या मारायला सुरुवात करू नका. त्याआधी थोडसं व्यायाम करा.
ज्या लोकांना दमा किंवा श्वसनाचा आजार आहे त्यांनी दोरी उडी मारू नये.
जी लोकं हृदयाशी संबंधित कोणत्याही समस्येने जात असाल तर त्यांनी दोरी उडी मारू नये.
ऑस्टियोपोरोसिस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हाडांशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी दोरी उडी मारू नये.
ज्या लोकांना हर्निया आहे किंवा अलीकडे कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांनीही दोरी उड्या मारू नये.
(टीप:- वरील टिप्सचा वापर करण्यापूर्वी क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)