एखादा व्यक्ती धूळ किंवा धुराच्या संपर्कात सतत येत असेल, तर त्याच्या डोळ्यांमध्ये खाज आणि जलन होते. त्यामुळे त्या व्यक्तीचे डोळे लाल होतात. तसंच कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असल्यास डोळे लाल होण्याची समस्या उद्भवते. पण डोळे लाल होण्याबरोबरच त्यांना खाज येत असेल किंवा पाणी येत असेल, तर ही समस्या गंभीर असण्याची शक्यता आहे. आपण नेहमी रात्रभर जागरण करतो, त्यामुळे आपले डोळे लाल होतात. काही वेळेला आपल्या शरीराला थकवा जाणवत असेल, अशा परिस्थितीतही डोळे लाल होतात. काही माणसं डोळे लाल होण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. परिणामी डोळ्यांच्या समस्या अधिक वाढते. जाणून घेऊयात डोळे लाल होण्यामागे नेमकी कोणती कारणं दडली आहेत…
तज्ज्ञ काय म्हणतात?
आय ड्रॉप्स बनवणाऱ्या गोल्डन आयच्या सल्लागार डॉ. निसा असलम यांनी दिलेली माहिती अशी की, डोळे लाल होणे आणि डोळ्यांचे संक्रमणाची समस्या नेहमीप्रमाणे सामान्य आहे. दहापैकी एक व्यक्ती डोळ्यांच्या समस्येनं ग्रस्त आहे. डोळे लाला होण्याची अनेक कारणं आहेत. अनेकदा या समस्या सामान्य असतात. तर काही वेळेला डॉक्टरांची मदत घ्यावी लागते. आरोग्याच्या अनेक समस्या डोळे लाल होण्यामागचं कारणं असू शकतात.
संसर्ग
जेव्हा डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं संसर्ग होतो, त्यावेळी डोळे लाल होण्याची शक्यता असते. विषाणूच्या संसर्गामुळं लाल झालेल्या डोळ्यांतून पाणी येतं. तसंच जंतुंमुळं डोळे लाल होतात आणि त्यांच्यातून पिवळं पाणी बाहेर पडतं.
कोविड-१९
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फटका फुप्फुस आणि हृदयाला बसतो. याच कारणामुळं डोळ्यांनाही संसर्ग होऊ शकतं. कोरोना विषाणू डोळ्यांतून प्रेवश करून डोक्यातील मागील भागात पोहोचतो. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळंही डोळे लाल होण्याची शक्यता असते.
ब्लॅफरायटीस
ब्लॅफरायटीस डोळ्यांचं एक आजार आहे. हा आजार जंतुंमुळं होतो. अनेकदा चुकीचे आणि एक्सपायर झालेल्या ब्यूटी प्रोडक्टमुळंही ब्लॅफरायटीस आजार होऊ शकतो. यामुळे शरीरावर सूजही येते. ब्लॅफरायटीसच्या कारणामुळंबी डोळे लाल होऊ शकतात.
अॅलर्जी
जेव्हा डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होते, अशा परिस्थितीतही डोळे लाल होण्याची शक्यता असते. फुलांपासून उत्पादीत होणाऱ्या परागपासून पोलन अॅलर्जी होते.
कॉन्टॅक्ट लेन्स
डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करण्यापूर्वी त्याला साफ केलेलं नसतं. त्यामुळे संसर्गाची शक्यता वाढते. लेन्सचा सतत वापर केल्यामुळं आणि रात्रीच्या वेळी लेन्स घालून झोपल्यावर त्या व्यक्तीला एकॅन्थअमीबा केराटायटिस आजार होण्याची शक्यता असते. केरायटिसमुळं कार्नियामध्ये सूज येण्याची समस्या उद्भवते. केरायटिस आजार अनेकवेळा आंधळेपणाचं कारण बनते.
कसा कराल उपचार?
डोळे लाल झाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करू नये. डोळे चांगल्या पद्धतीत साफ करत राहा. डोळ्यांना स्पर्ष करण्याधी हात स्वच्छ धुवून घ्या. अॅंटीबॅक्टेरियल आय ड्ऱ़ॉपचा वापर करा. यामुळं तुमच्या डोळ्यांना विश्रांती मिळेल आणि डोळे लाल होण्यापासून बचाव होईल.