मासिक पाळी येणे ही एक सामान्य बाब आहे. ती काहींना एका निश्चित तारखेवर येते. मात्र काहींना ती उशिरा येते. याच्या मागे अनेक कारणे असू शकतात. गर्भवती झाल्यास मासिक पाळी येणे थांबते. मात्र असे काही नसल्यास हा चिंतेचा विषय होऊ शकतो. मासिक पाळी उशिरा येण्याची अनेक कारण असू शकतात. मासिक पाळी उशिरा का येते यामगील कारणे आज आपण जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहवलांनुसार पॉलिस्टिक ओवरी सिंड्रोम म्हणजेच पीसीओसी अनियमित मासिक पाळीचे एक कारण असू शकते. ही एक हार्मोनल समस्या आहे. त्याचबोरबर लैंगिक संबंधांमुळे झालेल्या संक्रमणामुळे देखील मासिक पाळी उशिरा येऊ शकते. पुढे अजून काही कारणे देण्यात आली आहेत.

(चिंता घालवण्यासाठी करा ‘हे’ उपाय, फरक दिसेल)

१) तणाव

तणाव अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. मासिक पाळी उशिरा येण्याला तणाव कारणीभूत असू शकतो. महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरोन आणि टेस्टोस्टेरोन नावाचे तीन हार्मोन असतात. त्यांच्यात बिघाड झाल्यास मासिक पाळीचे चक्र बिगडते. या सर्व समस्या तणावामुळे होतात.

२) वजन

लठ्ठपणामुळे महिलांमध्ये मासिक पाळी उशिरा येऊ शकते. वजन झपाट्याने कमी होत असताना देखील अनियमित मासिक पाळीची समस्या होऊ शकते.

३) गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर

गर्भधारणा होऊ नये यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर होतो. गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराने देखील मासिक पाळी उशिरा येऊ शकते.

(बाळ कसे शांत होते? संशोधकांच्या अभ्यासातून मिळाले ‘हे’ उत्तर)

मासिक पाळी सुरळीत करण्यासाठी हे करा

हळद दुधामधे मिसळून पिल्याने मासिक पाळी वेळेत येण्यात मदत होऊ शकते. तसेच अद्रक, मध, काळी मिरी पाण्यात घालून त्यास उकळून पिल्याने फायदा होऊ शकतो. दुधासोबत दालचीनी पावडरच्या सेवनानेही मासिक पाळी वेळेत येण्यासाठी मदत होऊ शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What are the reasons for irregular periods ssb