शरीराच्या स्वच्छतेसोबतच आपल्या तोंडाची आणि दातांची स्वच्छताही तितकीच महत्त्वाची आहे. गावाकडे कडुनिंबाच्या काड्यांचा वापर दात स्वछ करण्यासाठी केला जातो. मात्र आता बहुतांश भागांमध्ये टूथपेस्ट आणि टूथब्रशचा वापर केला जातो. रोज आंघोळ केली नाही तरी रोज सकाळी ब्रश नक्कीच केला जातो. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना ब्रश करायला फारच कंटाळा येतो. अशा परिस्थितीत हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की जर एखाद्या व्यक्तीने महिनाभर ब्रश केला नाही तर त्याच्या दातांची काय हालत होईल.
अन्न खाणे होईल कठीण :
महिनाभर ब्रश न केल्याने दातांमध्ये बॅक्टेरिया जमा होतील. आधीच दातांमध्ये सुमारे ७०० प्रकारचे ६० लाख बॅक्टेरिया आहेत, ज्यांची संख्या तुम्ही ब्रश न केल्यास अनेक पटींनी वाढेल. हे बॅक्टेरिया केवळ दातांमध्ये पोकळी निर्माण करणार नाहीत तर तुमच्या हिरड्या इतक्या कमकुवत करतील की काहीही न खाताही त्यामध्ये जळजळ होईल. यानंतर काहीही खाणे कठीण होईल. त्याच वेळी, तोंडाचा वास तुमच्या श्वासात शोषला जाईल.
हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ‘ही’ आहे झोपेची योग्य वेळ; आजच सवयीमध्ये करा बदल
दातांवर थर जमा होईल :
महिनाभर न केल्यास दातांवर घाणीचा एक जाड थर जमा होईल, जो कितीही वेळा ब्रश केला तरी उतरणार नाही. यासाठी तुम्हाला डेंटिस्टची मदत घ्यावी लागेल. साहजिकच हा थर जमा होताच दातांचा पांढरा रंगही निघून जाईल.
दात किडतील :
महिनाभर दात स्वच्छ न केल्यास, तुमच्या दातांची बॅक्टेरिया आणि रोगांशी लढण्याची ताकद संपेल आणि तुमचे दात पडू लागतील. दातांमधील कीड इतकी वाढेल की आपोआप तुमचे दात पडू लागतील. तुमचे सगळे दात पाडण्यासाठी केवळ काही महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे.
तोंडाची दुर्गंधी :
महिनाभर ब्रश केला नाही तर तोंडातून खूप वास येऊ लागेल, जे अगदीच सामान्य आहे. या दुर्गंधीमुळे तुम्हाला इतरांशी बोलताही येणार नाही, याशिवाय दातांना खूप नुकसान होते.