एखाद्या ठिकाणी आपण काम करीत असतो, तेव्हा तिथून बाहेर पडण्याचा म्हणजेच नोकरी सोडण्याचा विचार कधी ना कधी करतोच. अशा वेळेस ती संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडेल की नाही, तुम्ही नोकरी सोडून जाताना त्याचा परिणाम तुमच्या सहकर्मचाऱ्यांवर होईल का? वरिष्ठांचे काय म्हणणे असेल? असे कितीतरी प्रश्न, विचार आपल्याला करावा लागत असतो. सर्वांसोबत संबंध चांगले ठेवून एखाद्या ठिकाणाहून बाहेर पडणे कठीण असते. परंतु, अशा वेळेस काय करावे यांच्या टिप्स न्यूज १८ च्या एका लेखातील दिलेल्या माहितीवरून समजते.

तुम्ही नोकरी करीत असणाऱ्या ठिकाणाहून कुणालाही, कोणत्याही प्रकारचा त्रास न होऊ देता, तिथून कसे बाहेर पडावे ते पाहा.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
judiciary curb politics Courts Marathi speaking Chief Justice
मनमानी राजकारणावर न्यायव्यवस्था अंकुश ठेवू शकेल?

१. निर्णय विचार करून घेणे

आपण सध्या करीत असणारा जॉब/नोकरी का सोडणार आहोत, याबद्दल नीट विचार करा. तुम्ही ही नोकरी सोडल्यानंतर त्याचा तुमच्यावर कोणता परिणाम [चांगला-वाईट] होणार आहे ते लक्षात घेऊन मगच अंतिम निर्णय घ्या.

२. मॅनेजरसोबत चर्चा करणे

एकदा तुमचा निर्णय घेऊन झाल्यानंतर तुमच्या मॅनेजरला तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगा, त्यावर चर्चा करा. तुम्ही नोकरीवर असताना तुमच्या एकंदरीत अनुभवाबद्दल सांगा. त्यासोबतच या कामासाठी तुमची निवड केल्याबद्दल त्यांचे आभार माना. नोकरी सोडण्याचे तुमचे जे काही कारण असेल, ते त्यांना स्पष्टपणे सांगा. त्यामुळे वरिष्ठांच्या मनातही तुमच्याबद्दल आदर निर्माण होते.

हेही वाचा : जॉब इंटरव्ह्यूआधी काय खावे अन् काय टाळावे? पाहा ‘या’ पाच उपयुक्त टिप्स

३. औपचारिक राजीनामा पत्र

ज्यांनी तुमची या पदासाठी निवड केली त्यांना तुमचा नोकरी सोडण्याचा निर्णय केवळ तोंडी न सांगता, रीतसर एक औपचारिक पत्र पाठवावे. त्यामुळे तुमची नोकरी सोडण्याची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होईल. त्यासोबत कंपनीकडून मिळणारे इतर फायदे [प्रॉव्हिडंट फंड] घेणेसुद्धा सोईचे होईल.

४. सहकर्मचाऱ्यांना माहिती देणे

अनेक काळ सोबत काम केलेल्या तुमच्या सहकर्मचाऱ्यांना तुमच्या निर्णयाबद्दल अंदाज द्या. त्यामुळे तुमच्यातील संबंध नोकरी सोडल्यानंतरदेखील चांगले राहून इतर भविष्यात त्यांच्याकडून कामासंबंधी नवीन संधी मिळण्यास मदत होऊ शकते.

५. इतरांना मदत करा

तुम्ही नोकरी सोडून गेल्यानंतर जर तुमच्या जागी आलेल्या बदली व्यक्तीला काही प्रश्न असल्यास, त्यास मदत करावी. तुमच्या नोटीस पीरियडमध्येदेखील इतरांना मदत करा. त्यामुळे तुमची छाप इतरांवर पडतेच; मात्र इतरही तुमच्याकडे एक चांगले उदाहरण म्हणून बघतात.

६. इतरांसोबत संपर्कात राहणे

तुम्ही एखादी नोकरी सोडून जात असताना तेथील लोकांच्या कायम संपर्कात राहा. त्यामुळे तुम्हाला भविष्यात कधी काही अडचण आल्यास त्यांची मदत घेऊ शकता.

हेही वाचा : ‘मित्शी इंडिया’ कंपनीच्या सीएफओने चक्क हाताने लिहिले राजीनामा पत्र; सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो पाहा

एखाद्या ठिकाणाहून निघून जाताना [नोकरी सोडून जाताना] आपण कशा प्रकारे जात आहोत ते फार महत्त्वाचे असते. त्यामुळे या सहा टिप्स लक्षात ठेवून अगदी ताठ मानेने आणि सगळ्यांच्या मनात आपले एक स्थान निर्माण करून नोकरी सोडून जावे.