Symptoms of omicron bf 7 : देशात 2019 साली आलेल्या कोरोना महामारीने लाखो लोकांचा जीव घेतला. अनेकांनी आपले जवळचे लोक गमावलेत. तीन वर्षे ठाण मांडून बसलेल्या कोरोनाचा कहर या वर्षी मंदावल्याचे दिसत होते. अधून मधून त्याचे नवे व्हेरिएंट निघत होते, पण ते फार नुकसान करत असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे, आता कोरोना गेला की काय? असा प्रश्न उपस्थित होत असताना कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे बीए.५.१.७ आणि बीएफ.७ हे सब व्हेरिएंट आढळले आहेत. हे नवे व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य मानले जात आहेत.
ओमायक्रॉन बीएफ.७ काय आहे?
बीएफ.७ हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे. तो सर्वात आधी उत्तर पश्चिम चीनच्या मंगोलिया स्वायत्त भागात आढळून आला होता. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमागे हाच व्हेरिएंट जबाबदार आहे. हा व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरत आहे. अमेरिका, ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्ये देखील त्याचे रुग्ण आढळले आहेत. भारतातही बीएफ.७ विषाणू आढळला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
(निरोगी मेंदूसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, स्मरणशक्ती वाढण्यात होईल मदत)
तज्ज्ञांच्या मते, बीएफ.७ चे संसर्गाचे प्रमाण खूप अधिक आहे. या व्हेरिएंटचे लक्षण सौम्य आहेत. त्यापासून घाबरण्याची गरज नाही. मात्र, हृदयविकार, मुत्रपिंडाचे आजार आणि यकृताच्या रोगाने ग्रासलेल्या व्यक्तींमध्ये याचे गंभीर लक्षण दिसू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
बीएफ.७ ची लक्षणे कोणती?
- सतत खोकलणे
- ऐकण्यात समस्या
- छातीमध्ये वेदना
- थरथरणे
- वासात फरक वाटणे
नवे व्हेरिएंट आणि सब व्हेरएंटसोबत कोविड १९ चे रुग्ण वाढतात आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांमध्ये त्याची गंभीर लक्षणे दिसून येतात. तज्ज्ञांच्या मते, सणासुदीच्या दिवसात लोक खरेदीसाठी बाहेर जातात तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच, मास्क घालत नाही. त्यामुळे, कोविडची प्रकरणे वाढू लागतात. म्हणून सणासुदीच्या काळात कोरोनासंबंधी नियामांचे पालन करावे, असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.
(५० ते ८० वर्षे वय असलेल्यांनी ‘या’ सवयी लगेच लावा, अनेक आजारांपासून राहाल सुरक्षित)
येणारे दोन ते तीन आठवडे महत्वाचे आहेत. कोविड १९ अजूनही गेलेला नाही. जगातील विविध भागांतून कोविडचे नवे व्हेरिएंट समोर येत आहेत. अशात सणासुदीच्या काळात आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली पाहिजे, असा सल्ला नॅशनल टेक्निकल एडवायजरी ग्रुप ऑफ इम्युनायजेशनचे चेअरमेन डॉ. अरोडा यांनी दिला.