सामान्यतः गुदमार्गात होणाच्या आजारांमध्ये आपल्याला फक्त मुळव्याध अथवा पाईल्स या एकाच आजाराची माहिती आहे. परंतु असह्य वेदना देणारा व डोळ्यांतून पाणी आणणाऱ्या गुदमार्गात होणाऱ्या फिशर या आजाराविषयी आपण माहिती घेऊयात.

फिशर म्हणजे काय?

मुख्यतः गुदमार्गात होणारे व्याधी हे मलावष्टंभ (Constipation) व शरीरातील वाढलेली उष्णता या दोन कारणांमुळे होतात. सततच्या बध्दकोष्ठतेमुळे शौचास कुंथावे लागल्याने अनेकदा गुदमार्गाची बाह्य भागातील त्वचा फाटली जाते व तिला चिरा पडतात. शरीरातील अतिशय संवेदनशील भागात अशा प्रकारे जखम तयार होते. यालाच फिशर असे म्हणतात. आयुर्वेदात यांस परिकर्तिका म्हटले जाते. परिकर्तिका म्हणजे कातरल्याप्रमाणे अथवा कापल्याप्रमाणे वेदना होणे.

लक्षणे:

१) शौचाच्या वेळेस व नतंर आग होणे.

२) शौचाच्या वेळेस व नतंर वेदना होणे.

३) शौचाला साफ न होणे (बध्दकोष्ठता)

४) शौचाच्या ठिकाणी मांखल भाग जाणवणे.

५) शौचाच्या ठिकाणी खाज येणे

६) शौचा समवेत रक्तस्ञाव होणे

प्रकारः

मुख्यतः याचे दोन प्रकार पडतात.

१) Acute fissure: बध्दकोष्ठतेमुळे नुकतीच लक्षणे दिसू लागली आहेत. सध्याच ञास सुरु झालाय यापूर्वी नव्हता. यालाच Acute fissure म्हणतात. यामध्ये जखमा खोलवर नसतात व गुदमार्गाची त्वचा संपूर्ण लाल झालेली असते

२) Chronic Fissure:  सतत अंगावर काढल्याने हा आजार जूना होत जातो. त्वचेच्या जखमा आतमध्ये खोलवर वाढत जातात व ञासाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाते यालाच Chronic Fissure असे म्हणतात. यात अनेकदा गुदमार्गाच्या बाह्यभागी जखमेच्या संरक्षणार्थ शरीराकडून आवरण म्हणून मांसल भाग तयार होतो. त्याला Sentinle Tag म्हटले जाते बऱ्याचदा External Piles व Sentinle Tags यामध्ये रुग्णांकडून व वैद्यांकडूनही गल्लत होते.

मुख्य शत्रू:

फिशर हा व्याधी गुदमार्गात होणाऱ्या व्याधींमध्ये मुख्य शञुचे काम करतो. कारण फिशर झाल्यामुळे मुळव्याध, भगंदर, मलावष्टंभ, नाडीव्रण हे सर्व व्याधी वाढण्यास मदत होते. त्यामुळे फिशरची योग्य वेळेस तपासणी आणि उपचार करणं गरजेचं आहे. फिशरमध्ये आढळणारे मुख्य लक्षण म्हणजे गुदमार्गाची जागा छोटी होते. त्यामुळे त्याठिकाणी आंकुचन क्षमता वाढते आणि Spasm तयार होतो. यामुळे प्रत्येक वेळेस कुंथावे लागते व परिणामस्वरुपी जखम, वेदना व आग सर्व वाढीस लागते.

कारणेः

१) मलावष्टंभ/ बध्दकोषठता (उेपीींळरिींळेप)

२) अती तिखट, अती तेलकट व बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

३) मासांहार, मद्यसेवन, तंबाखू व धुम्रपान

४) सततचे बैठे काम

५) अती जागरण

६) जेवणाचा व व कामाच्या अनियमित वेळा

७) अनुवांशिक

उपचारः

Acute fissure–  नुकताच सुरु झाल्यामुळे आयुर्वेदिक औषधं आणि पथ्य याद्वारे संपूर्ण बरे करता येतो

Chronic Fissure– यांत क्षारसूञ चिकित्सा व Anal Dilatation अशा दुहेरी पध्दतीची चिकित्सा करावी लागते. चिकित्सेनंतर रुग्ण संपूर्णपणे बरा होतो.

क्षारसुञ चिकित्सेचे फायदेः

– रक्तस्ञाव होत नाही

– कुठलीही कापाकापी नाही.

– ॲडमिट राहण्याची आवश्यकता नाही

– शौचावरील नियञंण जाण्याचा धोका नाही

– सर्वात महत्वाचे कमी खर्चात उपलब्ध

डॉ. भारत भदाणे (आयुर्वेद तज्ञ)
शाश्वती ॲनो रेक्टल हॉस्पिटल
Website: http://shashwatiinpiles.com/about.php