Goosebumps: अंगावर काटा येणे ही एक सामान्य शारीरिक स्थिती आहे. जेव्हा आपण खूप घाबरतो, त्या वेळेस आपल्यावर अंगावर शहारे येत असतात. काही वेळेस आनंदाच्या, उत्साहाच्या प्रसंगीदेखील अंगावर काटा येऊ शकतो. अनेक जणांनी हा अनुभव इतिहासाच्या तासाला शूरवीरांच्या गोष्टी ऐकताना घेतलेला असतो. याव्यतिरिक्त देशभक्तिपर गीत ऐकताना किंवा त्यासंबंधित सादरीकरण पाहतानाही नकळतपणे अंगावर काटा येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भय, आनंद, दु:ख अशा भावना अचानक दाटून येतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट हार्मोन तयार होत असते. या हार्मोनमुळे शरीरातील काही स्नायू सैल होतात. सैल झालेले स्नायू अचानक काही सेकंदांसाठी पुन्हा ताणले जातात. या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात आणि मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते. याला आपण अंगावर काटा येणे असे म्हणतो. जर अचानकपणे आपल्या डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आल्यास तेव्हाही क्षणभरात अंगावर काटा आल्याचे लक्षात येते.

ही स्थिती मानवाच्या संवदेनशीलतेशी संबंधित आहे. भीती, आनंद यांसारख्या गोष्टींमुळे अंगावर काटा येऊ शकतो. याव्यतिरिक्त थंड वातावरणामुळेही ही स्थिती निर्माण होऊ शकते. गार वाऱ्याचा परिणाम शरीरावर होत असतो. तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे यासाठी शरीराच्या आतमध्ये काही बदल होत असतात. या बदलांच्या प्रतिक्रिया म्हणून अंगावर काटा येऊ शकतो. याव्यतिरिक्त काही आजारांमुळेही अंगावर सतत शहारे येऊ शकतात. अशा वेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार करवून घेणे आवश्यक असते.

आणखी वाचा – पुरुषांच्या दाढीमुळे महिलांच्या चेहऱ्यावर अ‍ॅक्ने, पिंपल्स येऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून..

Goosebumps सतत येत असल्यास काय करावे?

जेव्हा आपल्या अंगावर काटा येतो, तेव्हा शरीरातील स्नायू ताणले जातात. अंगाचे मालिश केल्याने ताणलेले स्नायू पुन्हा एकदा सैल होऊ शकतात. याव्यतिरिक्त ध्यानधारणा, नियमित व्यायाम, योगा केल्याने Goosebumps येण्याचे प्रमाण कमी होते. या गोष्टींमुळे मन आणि शरीर शांत होण्यास मदत होते. अंगावर काटा येणे किंवा अंगावर शहारे येणे ही सामान्य बाब असते. पण जर असे वारंवार घडत असेल, तर डॉक्टरांकडे जाऊन यावर सल्ला घेणे योग्य ठरते.