Aromatherapy Massage : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोक आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. अनेकदा त्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्यांना तणाव आणि सततची चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराला आवश्यकतेनुसार विश्रांती देणे खूप गरजेचे असते. अरोमा थेरपी ही एक आरामदायी थेरपी आहे; जी तुमच्या शरीराला आराम देण्यास मदत करते. तसेच ही केवळ शरीराला आराम देणारी थेरपी नाही, तर तुम्हाला तणाव व चिंता यांसारख्या समस्यांपासूनही दूर ठेवण्यास मदत करते आणि तुमच्यातील सकारात्मकता वाढवते. म्हणूनच जर तुम्हाला तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखायचे असेल, तर तुम्ही ही थेरपी अवश्य घेऊ शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरोमा थेरपी म्हणजे काय?

अरोमा थेरपीमध्ये तेलाचा वापर केला जातो आणि त्या तेलाने संपूर्ण शरीराला मालिश केले जाते. या थेरपीचे खास वैशिष्ट्य म्हणजे डिफ्युझरला वेगवेगळ्या सुगंधी तेलांमध्ये मिसळले जाते आणि त्यामध्ये औषधी वनस्पती आणि आले यांसारखे अनेक मसालेही वापरले जातात. अरोमा थेरपी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

हेही वाचा- Health Special: आध्यात्मिकतेने खरंच किती मानसिक बळ मिळते?

जसे की, तुम्ही डिफ्युझरच्या मदतीने संपूर्ण खोली तेलाच्या सुगंधाने व्यापून टाकू शकता. त्यामुळे खोलीत तुम्ही घेतलेल्या श्वासाद्वारे तेल तुमच्या शरीरात प्रवेश करते. त्याशिवाय बॉडी मसाजमध्येही तेलाचा वापर केला जातो.

अरोमा थेरपीचे फायदे

अरोमा थेरपीचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. ते म्हणजे जर तुमच्या शरीरात वेदना होत असतील किंवा तुम्हाला सांधेदुखीची समस्या असेल, तर या थेरपीमुळे तुमच्या सर्व समस्या दूर होऊ शकतात. तसेच आळस किंवा थकवा जाणवत असेल, तर ही थेरपी तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करू शकते. ही थेरपी केल्याने तणाव, चिंता, नैराश्य यांसारखे त्रासही दूर होतात; शिवाय डोकेदुखी किंवा मायग्रेनच्या समस्यांसाठी ही थेरपी रामबाण उपाय ठरू शकते.

(वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या थेरपीचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is aromatherapy how does it benefit the body in a hectic lifestyle jap
Show comments