Sweet Foods For Weight Loss Diet: वजन कमी करण्यासाठी या गोड पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.Weight Loss Diet: वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना, लोकांना वारंवार खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हणतात की, व्यक्ती जितका जास्त गोड खाणे कमी करेल तितके त्याचे वजन कमी होते. तसेच सामन्यत:गरजेपेक्षा जास्त गोड खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे मधूमेहसारख्या आजराच्या समस्या उद्धभवू शकतात. अशा स्थितीमध्ये तुम्ही हेल्दी आणि गोड पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. हे सुपरफुड गोड असूनही आरोग्याचे नुकसान होत नाही आणि वजन कमी करण्यासाठी विशेषत: चांगला फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर गोड पदार्थ

डार्क चॉकलेट
फायबर आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध असलेल्या डार्क चॉकलेटचा (Dark Chocolate) वजन कमी करण्याच्या आहारात समावेश करू शकता. डार्क चॉकलेट खाण्यामुळे वजन वाढत नाही आणि त्यामुळे शरीराला गरजेपेक्षा जास्त साखर मिळत नाही आणि डार्क चॉकलेटचे चव अधिक चांगली होते.

Lottery
Lottery : एनर्जी ड्रिंक खरेदी करण्यासाठी थांबला अन् नशीब पालटलं; लागली ८ कोटींची लॉटरी
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
keto diet keto-friendly oils
केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात
How peanuts can help in weight loss
शेंगदाणे वजन कमी करण्यात कशी मदत करू शकतात? कसे करावे सेवन? जाणून घ्या…
Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
virat kohli Anushka Sharma monotrophic diet benefits in marathi
विराट-अनुष्काचा ‘मोनोट्रॉफिक डाएट प्लॅन’ शरीरास खरंच फायदेशीर असतो का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात
Monotropic Diet Really Beneficial for Your Weight Loss
मोनोट्रॉपिक आहार तुमचे वजन कमी करण्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?

हेही वाचा – Weight Loss Smoothies : फार मेहनत न घेता वजन कमी करायचे का? मग डाएटमध्ये घ्या ‘या’ स्मुदीज

सफरचंद चिप्स

सफरचंद वाळवून किंवा बेक करून चिप्स बनवल्या जातात. सफरचंद चिप्स केवळ चवीलाच चांगले नसतात तर वजन कमी करण्यासही मदत करतात. त्यामध्ये फायबर आणि इतर पोषक घटक असतात जे आरोग्य निरोगी ठेवतात. सफरचंद चिप्स स्नॅक म्हणून खाण्यासाठी योग्य आहेत

खजूर

खजूर (Dates) चवीला गोड असतात पण इतके नाही की तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकतात. तसेच खजूर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. यामध्ये व्हिटॅमीन बी ६, फायबर, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम देखील मिळते. पण या गोष्टीची काळजी घ्या की, तुम्ही एकावेळी गरजेपेक्षा जास्त खजुराचे सेवन करून नका आणि त्याचे योग्य प्रमाणात सेवन करा.

हेही वाचा – तुमच्या बॉडी शेपनुसार निवडा कपडे! प्रत्येकजण करेल तुमच्या स्टाइलचे कौतुक

रताळे
वजन कमी करण्यासाठी अनेकदा रताळे खाण्याचा सल्ला दिला जातो. रताळे कमी कॅलरी आणि उच्च फायबरयुक्त आहे. त्यात व्हिटॅमिन सी, ए आणि बी 6 असते. रताळे तळल्यावरही छान लागते.

दहीबरोबर फळ खा

काही फळे ग्रीक दहीच्या बरोबर खाऊ शकतात. विशेषत: दह्यासोबत बेरी खाणे वजन कमी करण्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही ग्रीक दहीमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी खाऊ शकता.