Peru benefits in marathi: हिवाळ्यात आंबट-गोड चवीचा पेरू खाण्याचा आनंद सगळेच घेत असतात. पेरूची टेस्ट सगळ्यांना आवडतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पेरूमध्ये अनेक पोषक तत्व असतात. चेन्नई येथील श्री बालाजी मेडिकल सेंटरच्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. “पेरू हे व्हिटॅमिन सी, प्रतिकारशक्ती वाढवणारे, त्वचेच्या आरोग्यास प्रोत्साहन देणारे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. उच्च फायबर सामग्री पचनास मदत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी पेरू हा योग्य पर्याय आहे. पण, जर तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात पेरूचा समावेळी केला तर काय होईल?

आहारतज्ज्ञ दीपलक्ष्मी यांच्या मते, हे फळ दररोज खाल्ल्याने रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयाच्या आरोग्यास हातभार लागतो. पेरू वजन व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरतो,” त्या पुढे म्हणाल्या, “पेरूच्या सेवनानं त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत होते.”

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

पेरू हे अत्यंत पौष्टिक असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने अस्वस्थता निर्माण होऊ शकते. दीपलक्ष्मी यांनी चेतावणी दिली की, उच्च फायबर सामग्रीमुळे सूज येणे, गॅस होऊ शकतो, विशेषत: फायबर युक्त आहाराची सवय नसलेल्यांना. “मधुमेहावर औषधोपचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण पेरू रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी करू शकतो. तीव्र मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांनी सेवनावर लक्ष ठेवले पाहिजे.

क्वचित प्रसंगी दीपलक्ष्मी यांच्या म्हणण्यानुसार, पेरू तोंडावाटे ॲलर्जी सिंड्रोमला कारणीभूत ठरू शकतात, ज्यामुळे तोंड आणि घशात खाज सुटणे किंवा सूज येऊ शकते. समतोल राखण्यासाठी त्यांनी दररोज एक मध्यम पेरू किंवा एक वाटी चिरलेला पेरू खाण्याची शिफारस केली आहे.

पेरूमध्ये अनेक पोषकतत्त्व असतात. पण, अनेकांना हे माहीत नाही की, पेरूसोबतच पेरूच्या पानांमध्येही अनेक औषधी गुण असतात. पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात खनिज, व्हिटॅमिन्स आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशिअम भरपूर असतं.

इम्युनिटी वाढते

पेरूच्या पानांच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही. पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन्स सी असतात, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशात शरीराचा अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं, जे डोळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. नियमितपणे रिकाम्या पोटी पेरूच्या पानांचं सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. पेरूच्या पानांमध्ये तणाव दूर करणारे गुण असतात आणि मानसिक आरोग्यही चांगलं राहतं.

Story img Loader