Cloves Benefits : किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्त्व आहे. अनेक मसाल्यांना औषधींचा भांडार मानले जाते. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील गरम मसाल्यातील असाच एक पदार्थ म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर त्याचे फायदे भरपूर आहेत. आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डॉ. डिंपल जांगडा यांनी, जर तुम्ही दररोज एक लवंग खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल ते विशद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोज एक लवंग खाण्याचे मुख्य फायदे

१. रोगप्रतिकार शक्तीत वाढ- लवंगांमध्ये जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास साह्य मिळते. डॉ. जांगडा यांच्या मते, हे गुणधर्म सर्दी, खोकला व फ्लू यांसारख्या सामान्य समस्यांशी लढण्यास मदत करतात. तुमच्या नित्यक्रमात दररोज एक लवंग जोडल्याने तुमच्या शरीराला संसर्गाशी अधिक प्रभावीपणे लढण्याची ताकद मिळते.

२. मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर- मधुमेही किंवा मधुमेहपूर्व रुग्णांसाठी लवंग फायदेशीर ठरू शकते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH)ने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, लवंगामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात आणि टाईप-२ मधुमेहाम नियंत्रणात आणण्यासाठी मदत करू शकतात.

३. दातांच्या आरोग्यात सुधारणा- लवंग दातांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. डॉ जांगडा सांगतात की, लवंग खाल्ल्याने दातदुखी कमी होते आणि तोंडातील जीवाणूंची संख्या कमी होण्यास मदत होते. जर तुमच्या दातांमध्ये वेदना होत असेल, तर तुम्ही लवंगेचा वापर करू शकता. लवंगेमध्ये एनाल्जेसिक गुण असतात, जे दातांचे दुखणे कमी करतात. इतकेच नव्हे, तर डोकेदुखी होत असल्यास तुम्ही याच्या तेलाचा सुगंध घेऊ शकता. त्यामुळे लगेच आराम मिळेल. जर हिरड्यांमध्ये संसर्ग झाला असेल, तर लवंगाच्या पाण्याने गुळण्या करा.

४. तोंडाची दुर्गंधी दूर- वेगवेगळ्या कारणांनी तोंडाला दुर्गंधी येते. त्यामुळे लोक तुमच्यापासून दूर पळतात. तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. मात्र, केवळ लवंगेच्या मदतीने तुम्ही ही समस्या दूर करू शकता.

५ अँटिऑक्सिडंट्सची विपुलता- डॉ. जांगडा हेदेखील नमूद करतात की, लवंगांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे तणाव कमी होऊ शकतो. लवंग रोगांचा धोका आणि नुकसान कमी करू शकते.

६. पचनक्रिया सुधारण्यास मदत- आहारात लवंगांचा समावेश केल्यास तुम्हाला आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. डॉ जांगडा यांनी नमूद केले आहे की, लवंगातील काही पोषक घटक अन्नाचे तुकडे करून, पचनास मदत करतात आणि सूज येणे, वायू धरणे व बद्धकोष्ठता टाळतात.

७. हाडांची मजबुती- लवंग हाडांसाठीदेखील खूप फायदेशीर आहे. जर हाडे कमजोर असतील, तर तुम्ही सकाळी झोपेतून उठून दोन लवंगा चावून खाव्यात. त्यात भरपूर प्रमाणात मँगनीज असते आणि त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत मिळते.

तुम्ही दिवसभरात किती लवंगा खाव्यात?

तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी डॉ. जांगडा दररोज एक लवंग खाण्याची शिफारस करतात. एकदा तुम्हाला त्याची सवय झाली की, तुम्ही दररोज हे सेवन ३-४ लवंगांपर्यंत वाढवू शकता. मात्र, त्यामुळे अधिक सेवन टाळा. कारण- यामुळे अतिसार, रक्त गोठणे किंवा मळमळ यांसारखे त्रास होऊ शकतात.

गर्भवती स्त्रिया, यकृताचा आजार असलेल्या व्यक्ती व रक्त पातळ करणारी औषधे घेत असलेल्यांनी लवंगेचे सेवन सावधपणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावे.