स्त्रियांना येणारी मासिक पाळी ही एक नैसर्गिक देण आहे. पण, हेच जर पुरुषांसोबत झाले तर काय होईल? कधी विचार केला आहे का? एका कॉलेज कॅम्पसमध्ये याबाबतचा सर्वे करण्यात आला. यावेळी काही मुलींना यावर हसू आले, तर कही जणींनी त्यावर दिलखुलास उत्तरे दिली. बहुतेक त्यामुळे समाजात एक बदल येऊ शकेल, असे कॉलेजला जाणा-या एका मुलीने उत्तर दिले. बहुतेक यामुळे लिंग वादविवादच पूर्णपणे संपुष्टात येईल, यामुळे मुलं ही मुलींना जास्त समजून घेऊ शकतील, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ते सहनच करू शकत नाहीत अशी अनेक उत्तरे मुलींनी दिली.
दुसरीकडे, हाच प्रश्न मुलांना विचारला असता एका मुलाने तर चक्क मी आत्महत्या पत्र लिहेन असे म्हटले. तर एकाने मी गुगलवर काही देसी नुस्के शोधेन असे उत्तर दिले. चला, एक वेळ ही परिस्थिती मुलांवर आली तर त्याला ते सामोरेही जातील. पण, मुलांनो तुम्हाला एक प्रश्न आहे- तुम्ही यापुढे मुलींना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न कराल का?
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2014 रोजी प्रकाशित
पाहाः पुरुषांना मासिक पाळी आली तर काय होईल?
स्त्रियांना येणारी मासिक पाळी ही एक नैसर्गिक देण आहे. पण, हेच जर पुरुषांसोबत झाले तर काय होईल?
First published on: 18-11-2014 at 02:42 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What if guys had periods this video features amused girls devastated boys