Micro Wedding Benefits: भारतामध्ये लग्न समारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. मग त्याकरिता महागडी हॉटेल्स, डेस्टिनेशन वेडिंगचे ठिकाण, कपडे, दागिने, मेकअप, जेवण, वरात, सजावट, मानपान यांसाठी अनेक जण आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावतात. तर, काही लोक सामाजिक प्रतिष्ठा आणि दिखाव्यामुळे लग्नावर खूप खर्च करतात. दरम्यान, या सगळ्यामध्ये मायक्रो विवाहसोहळेही ट्रेंडमध्ये आहेत. त्यामध्ये लोक कमी पाहुण्यांना आमंत्रित करतात आणि कमी खर्चात आरामात लग्न करतात.

मायक्रो लग्न म्हणजे काय?

मायक्रो लग्न म्हणजे एक छोटे लग्न. त्यामध्ये लोक त्यांच्या खास लोकांना आमंत्रित करतात. मायक्रो विवाहसोहळ्यांना फक्त २० ते ५० पाहुणे उपस्थित राहू शकतात. या प्रकारच्या लग्नाचा खर्च कमी असतो. हल्ली बॉलीवूडमध्येही या लग्नाची पद्धत खूप प्रसिद्ध होत आहे.

भारतात मायक्रो लग्नाच्या ट्रेंडमध्ये वेगाने वाढ

अशा लग्नाची पद्धत परदेशांतील लग्नामध्ये आणि कोरोना काळात वापरली गेली; परंतु आता भारतातही मायक्रो लग्नाचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. खरं तर महागाई आणि लोकांची कमी उपस्थिती यांमुळे लोक या प्रकारच्या लग्नाला जास्त पसंती देत आहेत. विशेषतः कोरोना महामारीनंतर हा ट्रेंड अधिक दिसून आला आहे. या प्रकारच्या लग्नात केवळ जवळचे पाहुणे एकत्र येतात आणि लग्न समारंभाचा आनंद घेतात.

मायक्रो लग्नाचे फायदे

या स्वरूपाच्या लग्नांना कमी लोक उपस्थित असतात. त्यामुळे साहजिकचच त्यांचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करणे शक्य होते.मोठ्या आणि भव्य लग्नांच्या तुलनेत अशा लग्नाचे बजेट खूपच कमी असते.
अशा लग्नांमध्ये कमी लोक असतात आणि सर्वच दृष्टीने खर्चही खूप कमी होतो.

मायक्रो लग्नाचे तोटे

मायक्रो लग्नाचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. खरं तर यामध्ये मर्यादित पाहुण्यांना आमंत्रित केले जाते, ज्यामुळे बऱ्याच लोकांचा राग पत्करावा लागतो. अशा लग्नांमध्ये पारंपरिक भव्यतेचा अभावही निर्माण होतो.

Story img Loader