टॅनिंग ही लोकांसाठी मोठी समस्या आहे. काही लोक सौंदर्य वाढवण्याच्या आशेने आवर्जून टॅनिंग करतात, तर काही लोकांना त्वचेचे नुकसान होईल या भीतीने किंवा सूर्यकिरणांच्या संपर्कात आल्यास निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांमुळे टॅनिंग करणे अजिबात आवडत नाही. कित्येक लोक परफेक्ट टॅन्ड लूक मिळवण्यासाठी काही ट्रीक्सदेखील वापरतात. असाच काहीसा ट्रेंड सध्या टिकटॉकवर व्हायरल होत आहे. याला बिअर टॅनिंग या नावाने ओळखले जाते. नावाप्रमाणे यामध्ये ट्रेंडनुसार, सूर्यकिरणांच्या संपर्कात येण्यापूर्वी बिअर त्वचेला लावली जाते.
फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, लोकांच्या मते बिअरमधील हॉप्स हे मेलॅनिन सक्रिय करण्यास मदत करतात. (मेलॅनिन शरीरातील एक असा पदार्थ, ज्यामुळे केस, डोळे आणि त्वचेचे रंग (pigmentation) निर्माण होतात). त्वचेवर बिअर लावल्यामुळे जास्त गडद, अधिक टॅन मिळणे सोपे होते
एकाने TikTok व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, “टॅनिंगसाठी आधी बिअर वापरून पाहा, नंतर मला धन्यवाद म्हणा.” दुसर्याने चार स्टेप्सचा उल्लेख केला आहे. स्वस्त बिअर खरेदी करा, पाण्यात डुबकी मारा, बिअर शॉवर घ्या आणि सन टॅनचा आंनद घ्या. या ट्रेंडने असंख्य लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे की मेट्रोच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये मार्चपासून ‘बीअर टॅन’साठी ऑनलाइन सर्च १३७ टक्क्यांनी वाढला आहे. पण, जगभरातील त्वचाशास्त्रज्ञांनी (dermatologists) या नव्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – हाताच्या कोपराला दुखापत झाल्यानंतर इतक्या वेदना का होतात? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ
“टॅनिंगला गती देण्यासाठी कोणत्याही पद्धतीमुळे त्वचेचे अधिक नुकसान होते आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. फक्त एकच गोष्ट तुम्ही केली पाहिजे. समुद्रकिनारी गेल्यावर सनस्क्रीन लावा, अल्कोहोल नाही”, असे बोर्ड-प्रमाणित त्वचाशास्त्रज्ञ डस्टिन पोर्टेला यांनी सांगितले. त्यांचे दोन दशलक्षाहून अधिक टिकटॉक फॉलोअर्स आहेत.
“त्वचेवर अल्कोहोल लावल्यास तो नैसर्गिक तेल आणि ओलावा काढून टाकतो, ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि सूर्यप्रकाशामुळे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते. तसेच त्वचेवर बिअर लावल्याने ऍलर्जी होऊ शकते. बिअरमधील अतिरिक्त फ्लेवरिंगसारख्या घटकांवर अवलंबून तुम्ही स्वतःला फायटोफोटोडर्माटायटीस ( phytophotodermatitis ) नावाच्या महत्त्वपूर्ण फोटोटॉक्सिक रिअॅक्शनचा ( phototoxic reaction) धोका निर्माण करू शकता, जे अत्यंत वेदनादायक आहे आणि यातून बरे होण्यासाठी काही आठवड्यांचा वेळ लागू शकतो”, असे पोर्टेला यांनी पुढे स्पष्ट केले.
हेही वाचा – पहिला हार्ट अटॅक टाळण्यासाठी ॲस्पिरिन वापरता का? डॉक्टरांकडून जाणून घ्या; ते कसे काम करते?
याबाबत सहमती देताना, प्राइमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील त्वचारोगतज्ज्ञ, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि लेसर सर्जन, डॉ. नव्या हांदा यांनी सांगितले की, सन बाथ (टॅनिंगसाठी सूर्यकिरणांच्या संपर्कात येणे) करताना त्वचेला बिअर लावणे ही टॅनिंग प्रक्रिया वाढवणारी पद्धत सुरक्षित किंवा शिफारस केलेली नाही. सनबाथ करताना त्वचेवर बिअर लावल्याने अनेक कारणांमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. टॅनिंगसाठी बिअर किंवा अल्कोहोल वापरण्याचे काही दुष्परिणाम खाली दिलेले आहेत.
- वाढलेली संवेदनशीलता (Increased Sensitivity) : अल्कोहोल त्वचेला त्रासदायक ठरू शकते, ज्यामुळे ते सूर्याच्या अतिनील किरणांमुळे अधिक संवेदनशील बनवते. यामुळे सनबर्न आणि सूर्यकिरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.
- डिहायड्रेशन (Dehydration) : अल्कोहोल हा एक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे, याचा अर्थ ते त्वचेसह शरीराचे डिहायड्रेशन करू शकते. डिहायड्रेशन झालेल्या त्वचेला सूर्यकिरणांमुळे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते.
- त्वचेचे नुकसान (Disruption of Skin Barrie) : अल्कोहोल त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकू शकते.नैसर्गिक तेल निरोगी त्वचा राखण्यासाठी आवश्यक घटक आहे. अल्कोहोल वापरामुळे त्वचेवर कोरडेपणा, लालसरपणा आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
- सूर्य किरणांपासून संरक्षण देणारे पर्यायांचा वापर कमी होईल (Lack of Sun Protection): टॅनिंगसाठी बिअरवर अवलंबून राहिल्याने काही लोक सनस्क्रीनसारखे योग्य सूर्य किरणांपासून संरक्षण देणारे पर्याय वापरणे टाळू शकतात. यामुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
- सूर्यकिरणांपासून संरक्षण देणाऱ्या पर्यायांचा वापर कमी होईल (Lack of Sun Protection) : टॅनिंगसाठी बिअरवर अवलंबून राहिल्याने काही लोक सनस्क्रीनसारखे योग्य सूर्यकिरणांपासून संरक्षण देणारे पर्याय वापरणे टाळू शकतात. यामुळे सनबर्न, अकाली वृद्धत्व आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.