आजकाल लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे माणसाला ब्रेन फॉगची समस्या होऊ लागते. तणावाप्रमाणेच ब्रेन फॉग हा देखील एक मानसिक विकार आहे. या स्थितीत व्यक्तीची स्मरणशक्ती कमकुवत होते. त्याला सर्वकाही अस्पष्ट दिसू लागते. याशिवाय परिस्थिती समजून घेणेही त्याला अवघड जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, तो काहीतरी विचार करण्यास किंवा समजून घेण्यास असमर्थ ठरतो. बर्‍याच वेळा असे देखील दिसून येते की ब्रेन फॉग या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला काय करावे हे देखील समजत नाही. माणूस नेहमी गोंधळलेला असतो. त्याच वेळी त्याला नेहमी एकटेपणा जाणवतो. करोनाच्या काळात ब्रेन फॉगची समस्या जास्त वाढली आहे. करोनाशी सामना करत असलेल्या ७० टक्के लोकांना ब्रेन फॉग आजार असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊया या आजाराविषयी सर्व काही…

ब्रेन फॉगची कारणे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते ब्रेन फॉगचे मुख्य कारण म्हणजे तणाव. तणावामुळे उच्च रक्तदाब वाढतो. उच्च रक्तदाबामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते. तसेच थकवा जाणवतो. या स्थितीत मानसिक संतुलन बिघडते. अनेक प्रसंगी त्या व्यक्तीची जीभही डळमळू लागते.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
research to prevent memory issues in children with brain tumors
मेंदूत गाठ असलेल्या लहान मुलांमधील स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी संशोधन; गेल्या दोन वर्षांत टाटा रुग्णालयाचे संशोधन पूर्ण
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
peticoat cancer
साडी नेसणार्‍या महिलांना ‘पेटिकोट कॅन्सर’चा धोका? हा प्रकार काय आहे? अभ्यास काय सांगतो?
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम

( हे ही वाचा: Cinnamon Benefits: हिवाळ्यात दालचिनीचे सेवन केल्यास ‘हे’ १० आजार होतील दूर; जाणून घ्या यादी)

ब्रेन फॉगची लक्षणे

  • व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता
  • स्मरणशक्ती कमकुवत होणे
  • मानसिक स्थिती डळमळणे
  • लक्ष विचलित होणे
  • घाबरणे
  • झोप न लागणे
  • ताण

( हे ही वाचा: Diabetes Symptoms: मधुमेहाची पातळी २०० mg/dL पेक्षा जास्त झाल्यास हातामध्ये दिसू लागतात ‘ही’ ३ गंभीर लक्षणे; जाणून घ्या कसे ओळखावे)

ब्रेन फॉगच्या बचावासाठी उपाय

डॉक्टरांच्या मते ब्रेन फॉगच्या रुग्णांनी रोज किमान आठ तासांची झोप घेतली पाहिजे. तसेच चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे. या रुग्णांनी अल्कोहोलचे सेवन कमी केले पाहिजे. याशिवाय दररोज संतुलित आहारासोबत व्यायाम करणे गरजेचे आहे. यासोबत सोशल एक्टिविटी करा. यामुळे तुम्हाला एकटे वाटणार नाही.