आजकाल लोकांना धकाधकीचे जीवन जगण्याची सवय झाली आहे. त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामामुळे माणसाला ब्रेन फॉगची समस्या होऊ लागते. तणावाप्रमाणेच ब्रेन फॉग हा देखील एक मानसिक विकार आहे. या स्थितीत व्यक्तीची स्मरणशक्ती कमकुवत होते. त्याला सर्वकाही अस्पष्ट दिसू लागते. याशिवाय परिस्थिती समजून घेणेही त्याला अवघड जाते. सोप्या भाषेत सांगायचे तर, तो काहीतरी विचार करण्यास किंवा समजून घेण्यास असमर्थ ठरतो. बर्याच वेळा असे देखील दिसून येते की ब्रेन फॉग या आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तीला काय करावे हे देखील समजत नाही. माणूस नेहमी गोंधळलेला असतो. त्याच वेळी त्याला नेहमी एकटेपणा जाणवतो. करोनाच्या काळात ब्रेन फॉगची समस्या जास्त वाढली आहे. करोनाशी सामना करत असलेल्या ७० टक्के लोकांना ब्रेन फॉग आजार असल्याचे दिसून आले आहे. जाणून घेऊया या आजाराविषयी सर्व काही…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा