स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा अटॅक अथवा लकवा. याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धुम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे स्ट्रोक येण्याची शक्यता वाढते. भारतात दरवर्षी जवळपास १५ लाख लोकांना स्ट्रोक हा आजार सतावतो. स्ट्रोक हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. जर त्रास होत असेल तर लक्षणे सुरू होण्याच्या वेळेवर विशेष लक्ष द्या. स्ट्रोक सुरू झाल्यानंतर काही उपचारांचे पर्याय सर्वात प्रभावी असतात. लक्षणे थांबतात का हे पाहण्याची प्रतीक्षा करू नका. जितका उशीर उपचारासाठी होईल तितका मेंदूचे नुकसान आणि अपंगत्व येण्याची शक्यता जास्त असते.
कशा मुळे होतो ब्रेन स्ट्रोक ?
जेव्हा आपल्या मेंदूत एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा कमी होतो तेव्हा मेंदूच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये मिळण्यापासून रोखले जाते तेव्हा स्ट्रोक होतो. मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरतात. स्ट्रोक ही वैद्यकीय एमार्जन्सी आहे आणि त्यावर त्वरित उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. लवकर उपचार केल्यास नुकसान कमी होते. प्रभावी उपचार स्ट्रोकपासून अपंगत्व रोखण्यास देखील मदत करू शकतात.
ब्रेन स्ट्रोकची कारणे?
१.उच्च रक्तदाब
२. मधुमेह
३. धूम्रपान
४. हृदयविकार
५. लठ्ठपणा
६. वार्धक्ययामुळे अर्धांगवायू होऊ शकतो.
ही आहेत लक्षणं!
१.डोळ्यांपुढे अंधारी येणे
२.चालताना अडखळणे अथवा शरीराचे संतुलन बिघडणे
३.बोलताना अडखळणे
४.समरणशक्तीवर परिणाम होणे
५.बधिरता येणे
६.अशक्तपणा येणे
७.धुरकट किंवा दुहेरी प्रतिमा दिसणे
८.अचानक ओकारीसह डोकेदुखी
निदानासाठी आवश्यक चाचण्या –
प्रत्येक स्ट्रोकच्या निदानासाठी एमआरआय, ब्रेन अँजिओग्राम या चाचण्या केल्या जातात. रिस्क फॅक्टर शोधण्यासाठी हिमोग्लोबीन, रक्तातील साखर, लिपीड प्रोफाईड, होमोसिस्टिन २ डी इको या चाचण्या केल्या जातात.