उन्हाळा असो की हिवाळा अनेकजण डिओड्रेंट आणि परफ्यूमचा वापर करतात. बहुतेक जण डिओ किंवा परफ्यूम लावल्याशिवाय घराबाहेर पाऊल ठेवत नाहीत. यात काही लोकांनी याच्या सुगंधाची इतकी सवय झालेली असते की ते वापरल्याशिवाय त्यांना फ्रेश वाटत नाही. अनेकजण जरी डिओड्रेंट आणि परफ्यूमचा वापर करत असले तरी या दोघांमधील फरक अद्याप काहींना माहित नाही. हे दोन्ही वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जाते. उदाहरणार्थ, एकामध्ये जास्त सुंगध असतो तर दुसऱ्यामध्ये कमी सुगंध असतो. परफ्यूम आणि डिओ बराच फरक आहे, तो कसा ते जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परफ्यूम आणि डिओमध्ये नेमका फरक काय?

परफ्यूम आणि डिओमधील बेसिक फरक समजून घेण्यासाठी त्यातील केमिकल कंन्सट्रेशनची माहिती घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, डिओड्रेंटमध्ये अल्कोहोलचे प्रमाण १० ते १५ टक्के आहे आणि त्यात त्यात इतर मिसळलेले घटक १ ते २ टक्के असतात. म्हणजेच ते जास्त काळ टिकत नाही आणि घामाची दुर्गंधी शोषून घेत काही तासचं सुगंध देत राहतो. आता परफ्यूमबद्दल बोलायचे झाले तर त्यात अल्कोहोलचे प्रमाण १५ ते २५ टक्के असते, आणि इतर घटकाचे प्रमाण सुमारे २० ते २५ टक्के असू शकते. डिओचा वापर घामामुळे येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी केला जातो, तर परफ्यूमचा वापर कपड्यांना येणारा उग्र वास थांबवण्यासाठी केला जातो जो जास्तीत जास्त १२ तास टिकून राहू शकतो.

पुरुषांसाठी बेस्ट परफ्यूम कोणता?

१) पुरुषांनी अल्कोहोचलचे प्रमाण जास्त असलेल्या परफ्यूम निवडा. कारण पुरुषांचा घाम अधिक एसिडिक असतो आणि त्यातून खूप तीव्र वास येतो.

२) दुसरी गोष्ट परफ्यूमचा सुगंध इतकाही वाईट किंवा डार्क नसावा ज्याच्याने इतरांना त्रास होईल.

३) एकदम तिखट सुगंध असलेले परफ्यूम खरेदी करणे टाळा.

४) परफ्यूम लॉन्ग लास्टिंग असावा.

५) जर ते अँटी-पर्सपरेंट असेल तर ते डीओ म्हणूनही काम करू शकते.

रोजच्या वापरासाठी परफ्यूम की डिओडरेंट बेस्ट?

जर तुम्ही रोजच्या वापराबद्दल बोलत असाल तर तुम्ही डिओचा वापर करावा. ज्याचा सुगंध ५ ते ६ तास टिकतो, तसेच त्याच्या वापराने तुम्हाला ताजेतवाने वाटेल, याशिवाय परफ्यूमच्या स्ट्राँग सुगंधाने त्रास होणार नाही. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन परफ्यूम आणि डीओचा वापर करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is difference between perfume and deodorant which is the best for men in marathi sjr