What is emotionally Abuse In Marathi :प्रकरण पहिले :

साधारण ४० च्या वयोगटातील सीमा (नाव बदलले आहे), गावातून शहरात आलेली महिला. सीमाला नैराश्यासह एक तिला कन्व्हर्जन डिस-ऑर्डर (conversion disorder (फंक्शनल पॅरालिसीसचा अटॅक) होतो. सीमाचे तोंड थोडेसे वाकडे होत असे, हात पायांमध्ये त्राण नसल्यासारखे होऊन भोवळ येत असे; पण प्रत्यक्षात तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. जेव्हा सीमाने मानोसपचार तज्ज्ञांशी संवाद साधला तेव्हा असे समोर आले की, तिला होत असलेला त्रास हा मानसिक आहे. त्याबाबत अधिक जाणून घेतल्यावर लक्षात आले की, या सीमाचा पती तिला छोट्या छोट्या कारणावरून सतत बोलत असे. “ती शिकलेली नाहीये, ती गावाकडची आहे”, “तिला काही अक्कल नाही”, “ती जाडी आहे. त्यामुळे मी तिला उचलू शकणार नाही”, “थोडीशी हालचाल कर म्हणजे काहीतरी वजन कमी होईल”, असे उपहासात्मक विनोद तिच्यावर करायचा आणि तिला सतत टोमणे मारत असे. मुलांच्या शाळेतही सीमाला घेऊन जात नसे. “तिला इंग्रजी येत नाही,” असे तो बोलायचा. लग्नानंतर चारचौघांत, मित्र किंवा कुटुंबासमोर नेहमी नाव ठेवत होता. प्रत्येक गोष्टीवर तिला ओरडत होता, तिला दोष देत होता किंवा तिच्यावर उपहासात्मक टीका केली जात असे. हा एक प्रकारचा भावनिक छळ आहे ज्याचा परिणाम तिच्या मनावर झाला होता.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
stock market sensex and nifty
खिशात नाही आणा…

प्रकरण दुसरे

राहुल आणि प्रिया (नाव बदलले आहे) यांचे एकमेकांवर प्रेम होते; पण प्रिया तिच्या प्रियकराकडे काहीही मागण्या करीत असे आणि तिला नकार ऐकायची सवय नव्हती. काही झाले तरी आताच्या आता पाहिजे, असा हट्ट तिचा असे. राहुलकडे पैसे नसतील किंवा त्याला शक्य नसेल तरी ती समजून घेत नसे; उलट रडून गोंधळ घालत असे. “तुझे माझ्यावर प्रेम नाही”, “तू असाच आहेस”, ” तुला मी आवडत नाही”, “तुला दुसरे कोणीतरी आवडते म्हणून तू असा वागतोयस”, “तुझा फोन बिझी होता. तू काहीतरी लपवतोयस. तू मला फसवतोयस” असे आरोप प्रिया राहुलवर करीत असे; पण प्रत्यक्षात राहुल असे काही करीत नव्हता. अनेकदा प्रिया तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी स्वत:ला जीवे मारण्याच्या धमक्या देत असे. त्यामुळे राहुलला अपराधी असल्यासारखे वाटत असे. तो तिच्या सर्व मागण्या पूर्ण करीत असे. या प्रकरणामध्ये जे काही राहुल सहन करीत होता. तो एक प्रकारे भावनिक छळ होता.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी राहुल आणि सीमा यांचे उदाहरण देऊन भावनिक छळ म्हणजे काय याबाबत ‘लोकसत्ता’ला सविस्तर माहिती दिली.

भावनिक छळ म्हणजे काय? (What is emotional abuse?)

“भावनिक छळ (Emotinal Abouse) हा कोणत्याही नात्यात आणि कधीही होऊ शकतो,” असे डॉ. रश्मी जोशी-शेट्टी यांनी सांगितले. अनेकदा नात्यांमध्ये जोडीदाराला सतत टोमणे मारणे, नावे ठेवणे, नुसते दोष दाखवणे, सतत कमी लेखणे, जिव्हारी लागेल असे बोलणे, मन दुखावेल असे बोलले जाते. अनेकदा भावनिक छळ नकळतपणे होतो; तर अनेकदा तो जाणूनबुजून केला जातो. अनेकदा एखादी व्यक्ती त्याच्या मनातील असुरक्षिततेमुळे त्याच्या जोडीदाराला कमी लेखण्यासाठी असे वागते; तर अनेकदा आपल्या जोडीदाराला नियंत्रित करण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी जाणीवपूर्वक असे वागते. भावनिक छळामुळे पीडित व्यक्तीचे मानसिकरीत्या खच्चीकरण होते आणि मग ती व्यक्ती स्वत:ला दोष देत राहते. आपलेच काहीतरी चुकतेय, आपल्यातच काहीतरी कमतरता आहे, असा विचार ती करू लागते. याच गोष्टीला भावनिक छळ, असे म्हणतात. अनेकदा भावनिक छळ करणारी व्यक्ती पीडित व्यक्तीला सर्वांपासून दूर घेऊन जाते. नात्यामध्ये प्रेमासाठी किंवा नात्यासाठी पीडित व्यक्ती सर्व काही सहन करीत राहते. पण, भावनिक छळाचा त्यांच्या मनावर खूप विपरीत परिणाम होत असतो. अनेकदा पीडित व्यक्तीला याची जाणीव नसते की, तिचा भावनिक छळ होत आहे. तिच्या मनावर या बाबींचा परिणाम होतोय हेही तिला जाणवत नाही. कित्येकदा हा भावनिक छळ खूप गंभीर स्वरूपापर्यंत जाऊ शकतो; अशा परिस्थितीत संबंधित लोक पीडित व्यक्तीचा शारीरिक छळदेखील करू शकतात.

भावनिक छळ कोणाचा होऊ शकतो?

अनेक प्रकरणांमध्ये नवरा बायकोचा भावनिक छळ करीत असल्याचे समोर आले आहे; तर काही प्रकरणांमध्ये बायकोदेखील नवऱ्याचा भावनिक छळ करते किंवा प्रेयसीदेखील प्रियकराचा छळ करते, असे दिसून आले आहे.

काही प्रकरणांमध्ये मुलगा अथवा सून आई-वडील किंवा सासू-सासऱ्यांचा भावनिक छळ करतात. अनेकदा लहान मुलांनादेखील भावनिक छळाचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा – “मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा”; आजच्या पिढीच्या पालकांचे नक्की चुकतंय कुठे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

भावनिक छळ कोण करतं? (Who commits emotional abuse?)

  • अनेकदा एखादी व्यक्ती नकळतपणे दुसऱ्याचा भावनिक छळ करते. कारण- भावनिक छळ करणाऱ्या व्यक्तीच्या मनात एखादा मानसिक ताण-तणाव असू शकतो. जसे की, अनेकदा घरातील वाद, ऑफिसमधील ताण किंवा मालमत्तेवरून वाद, आर्थिक समस्या किंवा बेरोजगार अशा स्थितीमधून एखादी व्यक्ती जात असेल, तर त्या व्यक्तीला मानसिक त्रास होत असतो आणि त्याचा परिणाम जवळच्या नात्यांवर होतो
  • काही विशिष्ट स्वभावाच्या व्यक्तीदेखील भावनिक छळ करतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये ‘मीपणा’ खूप असतो. अशा व्यक्तीही इतरांचा भावनिक छळ करतात. काही लोक खूप भावनिक असतात किंवा भावनेच्या आहारी जाणारे लोकदेखील दुसऱ्यांचा नकळतपण मानसिक छळ करू शकतात.
  • अनेकदा एखाद्या व्यक्तीमध्ये स्वत:च्या बाबतीत असुरक्षिततेची भावना असते अशा वेळी इतरांना कमी लेखण्याचा प्रयत्न हे लोक करतात. एखाद्याचे दिसणे, वर्ण किंवा शरीरयष्टी यावरून मुद्दाम ते उपहासात्मक टीका करतात. एखाद्या विनोदाच्या नावाखाली कमी लेखणे हादेखील भावनिक छळच आहे.
  • अनेकदा भावनिक छळ करणाऱ्या व्यक्तीच्या मनावरदेखील काहीतरी मानसिक आघात झालेला असतो; ज्यामुळे ते इतरांसह असे वागू शकतात. अशा लोकांना तज्ज्ञांकडून समुपदेशन मिळणे आवश्यक असते.
  • अनेकदा मद्यपान किंवा नशा करणारे लोकदेखील जवळच्या व्यक्तीचा भावनिक छळ करतात. असे लोक त्यांच्या मुलांचा आणि पत्नीचा भावनिक छळ करतात. मग अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांचा बाहेरच्यांकडूनही भावनिक छळ केला जातो.

तुमचा भावनिक छळ होतोय हे कसे ओळखावे? (How to recognize when you are being emotionally abused?)

भावनिक छळ ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नात्यातील चुकीच्या गोष्टी ओळखायला शिका.

  • भावनिक छळ करणारी व्यक्ती पीडित व्यक्तीवर सतत ओरडते, सतत काही करताना टोकत राहते.
  • भावनिक छळ करणारी व्यक्ती पीडित व्यक्तीला नियंत्रित करू पाहते. अशा वेळी ती पीडित व्यक्तीला “हे करू नकोस”, “हे कपडे घालू नकोस”, “हे तुला चांगले दिसत नाही”, “तू काळी दिसतेस”, “तू जाड दिसतेस” असे बोलून सतत टोकत राहते.
  • ईर्ष्येच्या भावनेतून पीडित व्यक्तीला अनेकदा तू या मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर जाऊ नकोस, असे सांगितले जाते.
  • भावनिक छळ करणारी व्यक्ती अनपेक्षितपणे वागते, कधीही कोणत्याही गोष्टीवरून खूप चिडते. “तू याच्याबरोबर का गेलीस?”, “तू हेच का केलंस?” असे बोलून पीडित व्यक्तीला त्रास होईल असे वागते.
  • भावनिक छळ करणारी व्यक्ती स्वत:ची चूक असूनही पीडित व्यक्तीलाचा दोष देते. “शेवटी काहीच मोठे झाले नाही, तूच खूप जास्त विषय वाढवतेयस” असे ती पीडितेला दाखवते. जोडीदाराला खूप मॅनिप्युलेट (Manipulate) करतात. याला गॅस लायटिंग असेही म्हणतात.
  • भावनिक छळ करणारी व्यक्ती जोडीदाराचा व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम अकाउंट किंवा फोन चेक करते.
  • पीडित व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या नियंत्रित करू पाहतात आणि आपल्या मताप्रमाणे वागायला भाग पाडतात.
  • काही प्रकरणांमध्ये अशा व्यक्ती जोडीदाराचा लैंगिक छळ करतात. त्यातून अनेकदा जोडीदाराला मारणे, चावणे, चटके देणे, काहीतरी फेकून मारणे अशा गोष्टींमधून भावनिक छळाचे रूपांतर शारीरिक छळामध्ये होते.
  • अनेकदा छळ करणारी व्यक्ती माफी मागते. पुन्हा असे करणार नाही असे सांगते. काही दिवस प्रेमाने वागते आणि शांत राहते पण शेवटी पुन्हा भावनिक आणि शारीरिक छळ करतात. हे चक्र वारंवार सुरूच राहते. पीडित व्यक्ती जोडीदाराला माफ करते, सुधारण्याची संधी देतो पण पुन्हा तेच घडते. अशा स्थितीमध्ये पीडित व्यक्ती या दुष्टचक्रात अडकून राहतात.

भावनिक छळामुळे मानसिक परिणाम कसा होतो? (How does emotional abuse affect mental health?)

भावनिक छळाचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो. अनेकांना नैराश्य येते किंवा त्यासह खालील विविध लक्षणे दिसू लागतात :

  • पीडित व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो.
  • त्यांना एकटे वाटू लागते.
  • एकट्याने रडत राहणे
  • कशातच मन न लागणे
  • आपण कशात तरी अडकलो आहोत आणि आपल्याला बाहेर पडता येत नाहीये, असे वाटते.
  • काहीच न करण्याची इच्छा होणे
  • सतत दु:खी राहणे
  • पीडित व्यक्ती अचानक बोलणे बंद करते. अनेकदा पीडित व्यक्तीला नेमकं काय चाललंय ते दिसत नाही. प्रत्यक्षात शारीरिकदृष्ट्या तसा काही त्रास नसतो; तर तो त्रास त्यांना मानसिकदृष्ट्या जाणवत असतो.

हेही वाचा – एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबाने काय केले पाहिजे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…

भावनिक छळाचा सामना कसा करावा? (How to deal with emotional abuse?)

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीला लक्षात येते की, आपण एखाद्या अशा नात्यात आहोत की, ज्यामध्ये आपला भावनिक छळ होत आहे किंवा आपल्या मनावर त्याचा खूप परिणाम होत आहे तेव्हा त्या पीडित व्यक्तीने जवळच्या वा विश्वासू व्यक्तीला “मला असा त्रास होत आहे”, “मला हे जाणवते आहे,” असे सांगितले पाहिजे.
  • अशा वेळी पीडित व्यक्तीचे सर्व म्हणणे शांतपणे ऐकले पाहिजे. कोणत्याही प्रकारे स्वत:चे मत न लादता, समोरच्याचे ऐकून घेतले पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
  • जेव्हा कोणतीही व्यक्ती तुमच्याकडे येऊन असे काही सांगते तेव्हा त्या पीडित व्यक्तीला हे सांगा, “जे काही घडले; त्यात तुझा काही दोष नाही.” आणि “तू एकटी नाहीयेस; आम्ही तुझ्याबरोबर आहोत.”

अशा व्यक्तीमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसत असतील, तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जा. तेथे सुरुवातीला पीडित व्यक्तीचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर नात्यामध्ये पीडित व्यक्तीसह भावनिक छळ करणाऱ्या व्यक्तीचेही समुपदेशन केले जाते. नात्यातील अडचणी समजून घेऊन वाद सोडवले जातात. गरज असल्यास कुटुंबाचे समुपदेशन करणे गरजेचे असते. समुपदेशनामुळे भावनिक छळ आणि मानसिक त्रासातून तुमची सुटका होऊ शकते.

Story img Loader