शरीर निरोगी ठेवण्यासाठी यकृत निरोगी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्न पचवणे असो किंवा ग्लुकोज आणि प्रथिने तयार करणे असो, हे सर्व काम यकृत करत असते. पण यकृतच निरोगी नसेल तर सर्व समस्या उद्भवतात. सर्व यकृत रोगांपैकी फॅटी लिव्हर हा सर्वात सामान्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कानपूरच्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे डॉ. व्ही.के. मिश्रा म्हणतात, “जगातील जवळपास सगळ्या लोकांचं अल्ट्रासाऊंड केलं तर २५% लोकसंख्येला फॅटी लिव्हर होण्याची खात्री आहे. ते म्हणतात की फॅटी लिव्हरची समस्या एवढी आहे की मधुमेह आणि संधिवाताचे रुग्ण एकत्र केले तरी फॅटी लिव्हरचा आकडा त्यांच्यापेक्षा जास्त असेल.

आणखी वाचा: पतीच्या निधनानंतर स्विमिंग पूलमध्ये मित्रासोबत दिसली मंदिरा बेदी, सोशल मीडियावर ट्रोल होताच केली ‘ही’ गोष्ट

फॅटी लिव्हर म्हणजे काय?
सामान्य भाषेत यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याला फॅटी लिव्हर म्हणतात. जर चरबीचे वजन यकृतापेक्षा ५ टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तरीही त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. फॅटी लिव्हरचे दोन प्रकार असतात.

आणखी वाचा:व्हायरल मीम फेम अभिनेत्री कॅलिया पोसीचे वयाच्या १६ व्या वर्षी झाले निधन

फॅटी लिव्हरचे दोन टप्पे:
पहिले, जे अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे होते, त्याला अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणतात. दुसरे म्हणजे, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरमध्ये यकृताच्या आत चरबी असते पण त्यामुळे जास्त नुकसान होत नाही. परंतु नंतरच्या टप्प्यात समस्या येऊ शकतात.

आणखी वाचा: मेहूणीचा हात पकडून नवरदेवाने केले असे काही ‘ते’ दृश्य कॅमेऱ्यात झाले कैद

स्टीटो हेपेटायटीस हा मद्यपान न करणाऱ्यांमध्ये दुसरा टप्पा आहे. लवकरच याची काळजी घेतली नाही तर अवघड होऊ शकते. परिणामी, सिरॉसिस होण्याचा धोका आहे. तिसरा टप्पा, ज्यामध्ये यकृत संकुचित होऊन घट्ट होते. यकृताची कार्य क्षमता नगण्य होते. उपचार न केल्यास सिरॉसिसमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो.

आणखी वाचा:ट्विंकल खन्नाने मनीष मल्होत्राच्या फोनवरून केला होता ‘असा’ अश्लील मेसेज, पण जेव्हा समोरच्या व्यक्तीने…

फॅटी लिव्हरचा सर्वाधिक धोका कोणाला आहे?
तज्ज्ञांच्या मते, ज्यांचे वजन जास्त आहे, त्यांना फॅटी लिव्हर होण्याची भीती असते. याशिवाय मधुमेह असलेल्या रुग्णांना, विशेषत: टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांना फॅटी लिव्हरचा धोका असतो. हेपेटायटीस सी आणि उच्च कोलेस्टेरॉलमुळे देखील फॅटी लिव्हर होण्याची शक्यता वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is fatty liver know its symptoms grade stage medicine food and connection with diabetes blood sugar dcp
Show comments