फिश्टूला अथवा भंगदर म्हणजेच गुदमार्गाच्या बाजूला काही अतंरावर एक छिद्र तयार होऊन त्यातून पूरस्ञाव होण्यास सुरुवात होणे. तसंच हे बाह्यमुख असून त्याचे अंतर्मुख हे गुदद्‌वाराच्या आतील बाजूस तयार होणे म्हणजेच एक नलिका तयार होऊन त्यातून सतत पूरस्ञाव अथवा रक्तस्त्राव होत राहणे. भगंदर होण्याअगोदर त्या ठिकाणी गळू (Abscess)तयार होतो. गळू पक्वावस्थेत गेल्यानंतर तो फूटून त्यातून पूरस्ञाव चालू होतो. बऱ्याचवेळा Fistula हा Perianal Abscess म्हणून उपचार केला जातो व त्यासाठी I&D ही Surgicle Treatment केली जाते. परंतु त्यामध्ये फक्त बाह्यमुखाचा उपचार होतो. अंतर्मुखाचा उपचार न झाल्याने काही महिन्यांनी बाह्यमुखातून पुन्हा पूरस्ञाव चालू होतो. हे चक्र सतत चालू राहते. त्यामुळे कुठल्याही Perianal Abscess ची तपासणी करतांना अंतर्मुखाची तपासणी करणे अतिशय महत्वाचे ठरते. परंतु दुर्दैवाने खूप वेळा फिश्टूला चे निदान योग्य होत नाही.

फिशर म्हणजे काय? कारणं आणि लक्षणं काय? कशा पद्धतीने करु शकतो उपचार
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Suraj Chavan Said This Thing About His X Girl Friend
Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
aarti solanki reaction after suraj chavan won bigg boss marathi
“गरीब सूरजला जिंकवून माझ्यावर अन्याय”, मराठी अभिनेत्रीचं मोठं विधान; भावुक होत म्हणाली, “२४ वर्षांपासून या इंडस्ट्रीत…”
Vegetable vendor caught washing Vegetables in dirty water on street shocking video
“जगायचं की नाही” रस्त्यावर भाजीपाला खरेदी करताय? थांबा; हा VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Supriya Sule Dandiya
पुण्यात बजरंग दलाकडून दांडिया कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न; सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, “गुंडगिरी…”
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”

लक्षणे :
१) गुदद्वाराच्या बाजूला शोथ येणे (सुज)
२) गुदद्वाराच्या बाजूला रक्तस्ञाव चालू होणे
३) ताप येणे
४) शौचाच्या वेळेस वेदना होणे
५) पूरस्ञाव होत असेल तेथे असह्य वेदना होणे
६) भूक कमी होणे, पचनशक्ती मंदावणे
७) थोडे काम केल्यास थकवा येणे

प्रकार-
अंतर्मुख कोणत्या स्थानी आहे यावरुन भगंदराचे खालील प्रकार पडतात.
1. Submucosal Fistula
2. Intersphincteric Fistula
3. Transsphincteric Fistula
4. Extrasphincteric Fistula


भगंदर अथवा Fistula हा कोणत्याही ॲलोपॅथी, होमिओपॅथी अथवा आयुर्वेदिक औषंधानी पूर्ण बरा होत नाही. फक्त त्यामुळे होणारा ञास आपण औषंधानी कमी करु शकतो.

Complicated Fistula:-
भगंदर अथवा Fistula खूप वर्षे शरीरात राहिल्यास आतमध्ये तो वाढत जातो व काही वेळा त्याच्या शाखा तयार होतात. तर काही वेळा त्याचे स्वरुप वाढत जाते.

Multiple Fistula:-
यामध्ये अनेक बाह्यमुख व अनेक अथवा एक अंतर्मुख बघायला मिळतात.

Horse shoe Fistula:-
यामध्ये घोड्याच्या नाळाप्रमाणे भगंदराचे स्वरुप बघायला मिळते. बऱ्याच वेळा उजवी व डावी म्हणजेच गुदद्वाराच्या दोंन्ही बाजू या भगंदरात समाविष्ट होतात व त्याचे स्वरुप किचकट होत जाते.

I & D or Fistulotomy or Fistulectomy या Surigicle Procedure केल्यानंतर बऱ्याच वेळा भगंदर पुन्हा पुन्हा होत राहतो. कारण यामध्ये अंतर्मुख (Internal Opening) पूर्ण बरे होत नाही. तसेच हे सर्व उपचार वेळखाऊ, वेदनादायक व जास्त खर्चिक असतात. रुग्णास ३ महिने, ६ महिने अथवा काही वर्षानतंर त्याच ठिकाणाहून पुरञाव होत राहतो.

क्षारसुञ चिकित्साः-
भगंदर अथवा फिश्टूला यासाठी क्षारसुञ चिकित्सा आयुर्वेदाचे मोठे वरदान ठरले आहे. कारण यामध्ये भगंदर पुर्णपणे बरा होतो. पुन्हा होत नाही. मोठी जखम होत नाही. रुग्णास घरी राहून आराम करायची गरज नसते. रोज ड्रेंसिंग करण्याची आवश्यकता नसते. आठवड्यातून एकदा O.P.D. procedure (Thread Changing) फक्त यावे लागते. भगंदराचे अंतर्मुख कोणत्या स्थानी आहे यावरुन बरे होण्यास लागणारा कालावधी ठरला जातो.गुद्‌द्वारातील स्नायूना कोणतीही इजा होत नाही. त्यामुळे शौचावरील नियंञण जाण्याचा धोका निर्माण होत नाही.

क्षारसुञ चिकित्सेचे फायदे:-
– रक्तस्ञाव होत नाही
– कुठलीही कापाकापी नाही
– ॲडमिट राहण्याची आवश्यकता नाही
– शौचावरील नियञंण जाण्याची शक्यता नाही
– सर्वात महत्वाचे कमी खर्चात उपलब्ध

डॉ भारत भदाणे (आयुर्वैद तज्ञ)
(शाश्वती ऍनो रेक्टल हॉस्पिटल)
Website: http://shashwatiinpiles.com/about.php