फिश्टूला अथवा भंगदर म्हणजेच गुदमार्गाच्या बाजूला काही अतंरावर एक छिद्र तयार होऊन त्यातून पूरस्ञाव होण्यास सुरुवात होणे. तसंच हे बाह्यमुख असून त्याचे अंतर्मुख हे गुदद्वाराच्या आतील बाजूस तयार होणे म्हणजेच एक नलिका तयार होऊन त्यातून सतत पूरस्ञाव अथवा रक्तस्त्राव होत राहणे. भगंदर होण्याअगोदर त्या ठिकाणी गळू (Abscess)तयार होतो. गळू पक्वावस्थेत गेल्यानंतर तो फूटून त्यातून पूरस्ञाव चालू होतो. बऱ्याचवेळा Fistula हा Perianal Abscess म्हणून उपचार केला जातो व त्यासाठी I&D ही Surgicle Treatment केली जाते. परंतु त्यामध्ये फक्त बाह्यमुखाचा उपचार होतो. अंतर्मुखाचा उपचार न झाल्याने काही महिन्यांनी बाह्यमुखातून पुन्हा पूरस्ञाव चालू होतो. हे चक्र सतत चालू राहते. त्यामुळे कुठल्याही Perianal Abscess ची तपासणी करतांना अंतर्मुखाची तपासणी करणे अतिशय महत्वाचे ठरते. परंतु दुर्दैवाने खूप वेळा फिश्टूला चे निदान योग्य होत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा