Height & Age Chart: वजन हा आपल्या आयुष्यातील एक असा घटक आहे ज्यामुळे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक तणावही वाढतो. आपल्याला अनेकदा अति वजनामुळे समाजात किंबहुना आपल्याच माणसांमध्ये वावरताना सुद्धा न्यूनगंड जाणवू शकतो. केवळ जाडच नव्हे तर कमी वजन असणाऱ्या व्यक्तींनाही हा मानसिक त्रास सहन करावा लागतोच. महिलांमध्ये हा त्रास असल्यास मातृत्वातही अडथळा येतो. तुम्हाला हवी असणारी परफेक्ट बॉडी म्हणजे केवळ आकारानेच नव्हे तर सुदृढ आणि मजबूत असायला हवी. तुम्ही जसे वयाचा एक एक टप्पा पार करता तेव्हा तुमच्या वजनाचा आकडा बदलतो, आणि तेच अपेक्षित असते. तुमच्या घरातील अगदी लहानग्यापासून- आजी, आजोबांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींचे वय किती असायला हवे हे आज आपण पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजन कमी किंवा जास्त करण्याआधी आपल्याला ध्येय ठरवण्याची गरज आहे त्यामुळे आज आपण तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुमच्या वयाच्या कोणत्या टप्प्यात तुमचे योग्य वजन किती असावे हे समजून घेऊयात, त्यासाठी खाली दिलेला हा तक्ता नीट तपासून पाहा.

वयपुरुषांचे वजन स्त्रियांचे वजन 
नवजात बालक3.3 किलो3.3 किलो
2 ते 5 महिने  6 किलो5.4 किलो
6 ते 8  महिने 7.2 किलो6.5 किलो
9 महिने ते 1 वर्ष10 किलो9.5 किलो
2 ते 5 वर्ष12. 5 किलो11. 8 किलो
6 ते 8 वर्ष14- 18.7 किलो14- 17 किलो
9 ते 11 वर्ष28- 31 किलो28- 31 किलो
12 ते 14 वर्ष32- 38 किलो 32- 36 किलो 
15 ते 20 वर्ष40-50 किलो 45 किलो 
21 ते 30 वर्ष60- 70 किलो 50 -60  किलो 
31 ते 40 वर्ष59-75 किलो 60-65 किलो 
41 ते 50 वर्ष60- 70 किलो 59- 63 किलो 
51 ते 60 वर्ष60- 70 किलो 59- 63 किलो 

हे ही वाचा<< युरिक ऍसिडचा त्रास होत असल्यास कोणती फळे खावी व खाऊ नयेत? किडनीच्या बिघाडाची लक्षणे ‘अशी’ ओळखा

दरम्यान, वरील दिलेल्या तक्त्यानुसार तुम्ही आता या घडीला योग्य मापात नसाल तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा तक्ता तुम्हाला अंदाज देण्यासाठी आहे तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्यानुसार वजन वाढवू किंवा कमी करू शकता.

(टीप:वरील लेख हा माहितीपर आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये)