Age- Height – Weight Chart: अतिवजन हे सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी एक समस्या आहे. तरुण वयात आपल्या शरीराची चयापचय क्रिया उत्तम वेगाने काम करत असल्याने शक्यतो तरुणाईत किंवा बालवयात लठ्ठपणाचा त्रास होत नाही असा एक सामान्य समज पूर्वी होता. मात्र आता अगदी लहान मुलांमध्येही अतिवजनाची उदाहरणे वाढत आहेत. अहवालानुसार भारतात तब्बल १४. ४ मिलियन लहान मुलं ही अतिवजनाने त्रस्त आहेत युनिसेफच्या माहितीनुसार २०३० पर्यंत भारतातील अतिवजन असलेल्या लहानग्यांचा आकडा २७ मिलियन संख्या पार करणार असल्याचे अंदाज आहेत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार लहान मुलांमध्ये सुद्धा बैठी जीवनशैली वाढत असल्याने ही समस्या उद्भवत आहे.

डॉक्टरांच्या माहितीनुसार लहान मुलांमधील अतिवजन हे काही अंशी अनुवांशिक असू शकते पण याचा अर्थ असा होत नाही की हे वजन आटोक्यात आणलेच जाऊ शकत नाही. वयानुसार आपण आपल्या लहानग्यांच्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवून त्यांना योग्य पोषण देऊ शकता. एक लक्षात घ्या अनेकजण आपल्या लहान मुलांच्या अतिवजनाला गोंडस समजून दुर्लक्ष करतात पण हे अति वजन व बाहेरील खाण्यामुळे कॅलरीजचे अतिसेवन हे धोकादायक आहे. तुमच्या लहानग्यांच्या वयानुसार व उंचीनुसार त्यांचे वजन किती असायला हवे हे आज आपण पाहणार आहोत.

वयानुसार वजन किती हवे? (Weight As Per Age)

वयमुलं मुली 
1 वर्ष10.2 किलो9.5 किलो
2 ते 5 वर्ष 12.3 ते 16 किलो12 ते 15 किलो
3 ते 5 वर्ष14 ते 17 किलो14 ते 16 किलो
5 ते 8 वर्ष20 ते 25 किलो19 ते 25 किलो
9 ते 11 वर्ष28 किलो ते 32 किलो28 ते 33 किलो
12 ते 14 वर्ष37 ते 47 किलो38 ते 42 किलो
15 ते 18 वर्ष58 ते 65 किलो53 ते 54 किलो

उंचीनुसार वजन किती हवे? (Weight According to Height)

उंची सरासरी वजन 
४ फूट १० इंच ४१ ते ५२ किलो
५ फूट४४ ते ५७ किलो
५ फूट २ इंच४९ ते ६३ किलो
५ फूट ४ इंच४९ ते ६३ किलो
५ फूट ६  इंच५३ ते ६७ किलो
५ फूट ८  इंच५६ ते ७१ किलो
५ फूट १० इंच५९ ते ७५ किलो
६ फूट ६३ ते ८० किलो 

हे ही वाचा<< दिवसातील ‘या’ वेळात शेंगदाणे खाल्ल्यास वजन झपाट्याने होणार कमी? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या

दरम्यान, जर या वर दिलेल्या तक्त्यानुसार तुमच्या बाळाचे वजन आता या क्षणी नसेल तर ते त्या आकड्यात येण्यासाठी हट्ट व घाई करू नका. तुमच्या बाळाचे पोषणही तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारतज्ज्ञांचा फायदा घेऊन तुम्ही डाएट प्लॅन फॉलो करून घेऊ शकता.