Lazy Parenting Benefits : सामान्यत: Lazy या शब्दाचा अर्थ आळशी असा होतो पण येथे लेझी पॅरटिंगचा अर्थ आळशी पालक किंवा मुलांना संस्कार न देणे असा होत नाही तर त्याचा वेगळा अर्थ येथे आहे. लेझी पॅरेंटिंग स्टाईल (Lazy Parenting ) ज्यामध्ये आई-वडीलांनी मुलांचे प्रत्येक काम करण्याऐवजी मुलांना सुचना देऊन त्यांचे काम त्यांना करू देणे होय. लेझी पॅरेंटिंग म्हणजे मुलांना चुका करण्याची संधी दिली जाते आणि त्यांच्या चुका सुधारण्याची संधी दिली जाते आणि आई-वडील फक्त मार्गदर्शन करतात. लेझी पॅरेंटिंगचा अर्थ पालकांनी आळशी व्हावे असा आजिबात नाही, या पालकत्वाचा अर्थ मुलांची वाढ आणि विकाससाठी चांगले असते आणि ते प्रत्येक अडचणींचा सामना करण्यास शिकतात. चला जाणून घेऊ या कोणत्या पद्धती मुलांसाठी फायदेशीर दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुलांसाठी लेझी पॅरेंटिंगचे फायदे


मुले स्वावलंबी होतात
आळशी पालकत्वामध्ये असे दिसून येते की संगोपनाची ही पद्धत मुले मजबूत आणि स्वावलंबी बनवते. ही मुलं एकटी राहिली किंवा कधीही कोणत्याही संकटात सापडली तरी या समस्यांमधून स्वतःहून कसे बाहेर पडायचे हे त्यांना माहीत आहे.

हेही वाचा – घरात उंदरांनी धूमाकूळ घातला आहे का? या सोप्या ट्रिक्स वापरा, न मारताच गायब होतील घरातील सर्व उंदीर

आत्मविश्वास वाढतो
या प्रकारच्या पालकत्वाचा एक फायदा म्हणजे त्यातून मुले आत्मविश्वासू बनतात. आळशी पालकत्वामध्ये, मुले त्यांच्या आवडी-निवडी समजून घ्यायला शिकतात आणि बरोबर काय अयोग्य ते स्वतः ठरवतात. लहान मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो की, थोड्याशा मार्गदर्शनाने ते कोणत्याही आव्हानावर मात करू शकतात.

जबाबदार बनणे
लहानमोठी कामे तसेच मोठी कामेही मुलं करायला शिकतात. या पालकत्वामध्ये मुलांना केवळ स्वतःसाठी निर्णय कसे घ्यायचे हेच कळत नाही तर ते जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने हाताळतात. त्यामुळे मुलांचे भविष्यही चांगले घडते.

हेही वाचा – घोरणाऱ्या जोडीदारामुळे तुम्हाला शांतपणे झोपता येईना? मग हे ५ सोपे उपाय वापरून पाहा, घोरणे होईल बंद

नवीन गोष्टी शिकत राहतात
पालक जेव्हा लेझी पॅरेंटिंगस्वीकारतात तेव्हा मुलांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात. घरातील कामे कशी करायची, स्वतःची कामे कशी करायची आणि कोणकोणत्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः पार पाडायच्या हे मुलं शिकतात. यामुळे जगण्याची कौशल्ये देखील वाढते आणि आयुष्य कसे जगावे याची समज वाढते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is lazy parenting parents lazy parenting benefits for children lazy parenting tips snk
Show comments