गेल्या काही दिवसांपासून अनेक चॉकलेट उत्पादने वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेच आली आहे. अशात कॅडबरीच्या चॉकलेट उत्पादनांमध्येही एक घातक व्हायरस आढळून आल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हायरसच्या धोक्यामुळ कॅडबरीने हजारो चॉकलेट उत्पादने ही बाजारातून मागे घेतली आहेत. लिस्टेरिया असे या व्हायरसचे नाव असून याच्या भीतीने अनेक चॉकलेट कंपन्या आपली काही उत्पादने बाजारातून परत घेत आहेत.

कंपनीने यावर ताकीद दिली आहे की, ज्यांच्याकडे अजून उत्पादने आहेत त्यांनी ती खाऊ नयेत किंवा परत करावीत. यात १७ मे आणि १८ मे रोजी चिन्हांकित केलेली उत्पादनेही जोखमीच्या बॅचचा भाग असल्याचे दर्शवतात. कॅडबरीने ब्रिटनमधील स्टोअरमधून तब्बल सहा चॉकलेट्स प्रोडक्ट काढून टाकली आहेत. या नव्या व्हायरसमुळे चॉकलेट उत्पादने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. पण चॉकलेट उत्पादनांमध्ये आढळणारा लिस्टेरिया व्हायरस नेमका काय आहे, जो आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो आणि त्याची लक्षणे काय आहेत जाणून घेऊ…

a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत
money laundering in immigration
ED On Canada Colleges : कॅनडातील २६० महाविद्यालयांचा मानवी तस्करीशी संबंध; ‘ईडी’कडून धक्कादायक माहिती उघड
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट

कोणाला जास्त धोका आहे?

ब्रिटनमधील अनेक सुपरमार्केटमधून चॉकलेटची हजारो उत्पादने काढून टाकण्यात आली आहेत. लिस्टेरिया व्हायरसमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये लिस्टेरियाच्या संसर्गामुळे आता अनेक लोक सतर्क झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना याचा सर्वाधिक धोका आहे, कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती ही सामान्यत: कमकुवत असते. अशात हा व्हायरस त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि ती कायमची कमकुवत करतो. लिस्टेरिया म्हणजे काय आणि त्याचा धोका किती जाणून घेऊ…

लिस्टेरिया म्हणजे काय?

लिस्टेरिया हा एक असा व्हायरस आहे जो मानवासह सस्तन प्राण्यांमध्ये आढळतो. त्याच्या संसर्गाला लिस्टिरियोसिस असे म्हणतात. अमेरिकन एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलनुसार, त्याच्या संसर्गाचा परिणाम हाडे, सांधे, छाती आणि पोटावर थेट परिणाम दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी १ दशलक्ष लोकांपैकी ०.१ ते १० प्रकरणे आढळतात.

मोनोसाइटोजेन्स ही रोगजनक आजार निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांची एक प्रजाती आहे, त्यातीलच हा लिस्टेरिया व्हायरस आहे. जो ओलसर वातावरणात जसे की, माती, पाणी, कुजणारी वनस्पती आणि प्राणी यांमध्ये आढळू शकतो. यात जर संक्रमित प्राण्यांचे मांस वापरल्यास ते मानवापर्यंतही पोहोचू शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, संसर्ग झालेल्या प्राण्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. लिस्टेरिया व्हायरस रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेल्या अन्नात देखील टिकू शकतो, वाढू शकतो आणि अनेक वर्षे स्वत:ला जिवंत ठेवू शकतो.

हा बॅक्टेरिया किती धोकादायक?

सीडीसीच्या मते, लिस्टरियोसिसची लक्षणे रुग्णांमध्ये बदलू शकतात. सामान्यतः उलट्या, स्नायू दुखणे, खूप जास्त ताप, थंडी वाजणे, अतिसार ही लक्षणे दिसतात, रक्तात लिस्टेरिया मिसळल्याने मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. लिस्टरिओसिसमुळे दिसणारी लक्षणे साधारण फ्लूसारखी आहेत.

गर्भवती महिलांमध्य पोटदुखी किंवा बाळ नेहमीपेक्षा कमी हालचाल करत असल्याची लक्षणे दिसतात.

सीडीसीच्या मते, यूएसमध्ये दरवर्षी सुमारे १६०० लिस्टिरिओसिसची प्रकरणे आढळतात. डब्ल्यूएचओच्या मते, लिस्ट्रिओसिस हा एक गंभीर आजार आहे. पण ज्यावर औषधांनी उपचार करणे शक्य आहे.

त्यानुसार यूएस अन्न आणि औषध प्रशासनच्या मते मोनोसाइटोजेन्सचा संसर्ग झालेल्या लोकांना दूषित अन्न खाल्ल्यानंतर काही तासांत किंवा दोन ते तीन दिवसांपर्यंत लक्षणे दिसू लागतात. यातील लिस्टिरिओसिसचा अधिक गंभीर प्रकार विकसित होण्यास तीन दिवस ते तीन महिने लागू शकतात.

लिस्टिरिओसिसवर उपचार

आरोग्य तज्ञांच्या मते, बहुतेक लोकांसाठी, लिस्टिरोसिस सौम्य असतो आणि काही दिवसात बरा होतो. घरी आराम करून आणि भरपूर पाणी, ज्यूस असे लिक्विट पदार्थ पिऊन स्वतःची काळजी घेण्याची डॉक्टर शिफारस करतात.

लिस्टिरिओसिसचा धोका कसा टाळता येईल?

१) आपले हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावे.

२) फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या.

३) कोणतेही खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासून घ्या.

४) पॅक फूड ओपन केल्यानंतर २ दिवसांच्या आत खा.

५) तसेच एखादा पदार्थ फ्रिजमधून बाहेर काढल्यानंतर ४ तासांच्या आत खाण्यासाठी तयार करा.

६) गरम अन्न व्यवस्थित शिजले आहे की, नाही याची खात्री करून मगच खा.

Story img Loader