जगभरात अद्याप करोनाचा धोका कायम असतानाच आता यूकेमध्ये अलीकडेच आणखी एका नव्या विषाणूजन्य आजाराची नोंद करण्यात आली आहे. युकेमध्ये नव्या ‘नॉरोव्हायरस’ची (Norovirus) अनेक प्रकरणं नोंदवली गेली आहेत. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार (PHE) आतापर्यंत नॉरोव्हायरसचे १५४ रुग्ण आढळले आहेत. याविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेसने फोर्टिस हॉस्पिटल वसंत कुंजच्या इंटर्नल मेडिसिनचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मनोज शर्मा यांच्याशी बातचीत केली. यावेळी युकेमध्ये आढळलेल्या या नव्या ‘नॉरोव्हायरस’चा संसर्ग, त्याची लक्षणं आणि उपचारांविषयी मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे आहे.

Norovirus म्हणजे काय आणि कारणं काय?

डॉ. शर्मा म्हणतात कि, “नॉरोव्हायरस हा एक अत्यंत सांसर्गिक विषाणू आहे. यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार असे त्रास उद्भवतात.या रोगाचा प्रसार फिकल-ओरल रूटमार्फत होतो. म्हणजेच, एखाद्याला दूषित अन्न, पाणी किंवा आतड्यांसंबंधी हालचाली झाल्यास त्याचा संसर्ग होऊ शकतो. डॉ. शर्मा पुढे सांगतात कि, “हा व्हायरस पृष्ठभागावरही राहू शकतो. जर आपण हात स्वच्छता योग्य प्रकारे राखली नाही तर त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.”

What happens to your body when you consume fizzy drinks
तुम्ही सोडायुक्त पेय पिता तेव्हा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांकडून घ्या जाणून
How To Check fake or adulterated butter
Fake Or Adulterated Butter: तुम्ही बनावट बटर तर…
Bollywood actress Kiara Advani
Kiara Advani : कियाराने सांगितले चमकदार त्वचेमागील तिच्या आजीचे घरगुती ब्युटी सीक्रेट; तज्ज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे
Air pollution: Experts on what happens when you live above 16th floor of a high-rise building
मुंबई पुण्यात तुम्हीही उंच इमारतीत राहता का? मग डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचा
Laughing Benefits
Laughing Benefits: ताणतणाव दूर करण्यासाठी रोज फक्त १० मिनिटे खळखळून हसा! शरीराला मिळेल उर्जा
Winter skincare routine avoid these 3 things in winters it can harm your skin
Winter Skincare Routine: हिवाळ्यात ‘या’ तीन गोष्टी करणे टाळा, अन्यथा ठरू शकतात त्वचेसाठी धोकादायक; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत….
Best way to store ginger
आलं लवकर खराब होतं? दीर्घकाळ टिकवण्यासाठी ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स
diet and fitness
सतत प्रोटीन बार खाल्ल्याने आरोग्यावर कोणता परिणाम होतो? तज्ज्ञांचे मत काय…

विशेषत: पावसाळ्यात नॉरोव्हायरस चिंताजनक आहे. कारण पावसाळ्यात आपल्या घरातील पाण्याची गुणवत्ता फारशी चांगली असत नाही. याचबाबत, डॉ. शर्मा म्हणतात कि, “जर पाणी दूषित असेल तर त्याचा परिणाम घरातल्या लोकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. याचसोबत जर नॉरोव्हायरसची लागण झालेली एखादी व्यक्ती स्वयंपाक करत असेल तर त्यामुळे इतरांनाही त्याची लागण होऊ शकते.”

फिकल-ओरल रूट किंवा ऑरोफेकल म्हणजे काय?

फिकल-ओरल रूट म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी ‘पाच एफ’ म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायला हवं. फिंगर्स (बोटं), माशी(फ्लाईज), फिल्ड्स, फ्लूड (द्रवपदार्थ) आणि फूड (अन्न) यांमार्फत (मल कणांमार्फत) होणा-या संसर्गामुळे साधारणतः अतिसार, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ आणि हिपॅटायटीससारखे रोग होतात. ह्याच मार्गाने नॉरोव्हायरसचा संसर्ग होतो. त्यामुळे स्वच्छता सर्वात महत्त्वाची आणि प्राधान्य क्रमवार असायला हवी.

उपचार काय?

डॉ शर्मा म्हणतात कि, “ह्यात अँटिबायोटिक्स कोणतीही महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत. ह्यात प्रामुख्याने आपल्या हायड्रेटेड ठेवणं सर्वाधिक महत्त्वाचं आहे. त्यासाठी, ओआरएस अत्यंत उपयुक्त ठरेल. व्हायरल गॅस्ट्रोएन्टेरिटिस प्रकारचा आजार ५ ते ६ दिवस टिकतो किंवा काही वेळा जास्त काळासाठी देखील असू शकतो. डिहायड्रेशन रोखणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”याचसोबत, नॉरोव्हायरसचा संसर्ग रोखण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे योग्य त्या प्रमाणात स्वच्छता राखणं.

नॉरो व्हायरस आणि करोना व्हायरस या दोघांमध्ये फरक काय?

करोना व्हायरस हवेतून देखील पसरू शकतो. तर नॉरोव्हायरस ऑरोफिकल मार्गाने प्रसारित होतो. डॉ. शर्मा म्हणतात कि, “आपल्या अन्नातूनच हा विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे दोन्ही व्हायरसच्या संसर्गापासून लांब राहायचं असल्यास एकंदर स्वच्छता आणि विशेषतः हातांची स्वच्छ राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषाणूचा संसर्गाचा मार्ग वेगळा असतो. म्हणून करोनापासूनचा बचावासाठी मास्क वापरणं आवश्यक आहे.”