High Blood Pressure Symptoms: जीवनशैलीतील चुका, व्यायामाचा अभाव व फास्टफूडचा मारा यामुळेच शरीराला आजार विळखा घालतात. उच्च रक्तदाबाच्या आजाराने आज तरुणाईही त्रस्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील तब्बल १.१३ बिलियन लोकसंख्या ही उच्च रक्तदाबाने पीडित आहे. ताणतणाव, अतिवजन, मिठाचे अधिक सेवन हे सुद्धा कमी वयातच उच्च रक्त दाबाचा त्रास होण्याचे कारण ठरू शकते.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, साधारण रक्तदाब हा १२०/८० इतका असतो यापेक्षा कमी व यापेक्षा जास्त रक्तदाब शरीराला अपाय ठरू शकतो. बदलत्या जीवनशैलीनुसार १३०/८० हा रक्तदाबही नॉर्मल मानला जातो. तर १४०/९० च्या रेंजमधील रक्तदाब हा उच्च गटात मानला जातो. रक्तदाब वाढणे हे अनेक गंभीर समस्यांचे लक्षण ठरू शकते त्यातही जर रक्तदाब १८०/११० च्या रेंजमध्ये असेल तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे फायद्याचे ठरेल.

Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

अलीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे अगदी कमी वयापासूनच उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवू शकतात, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, मानसिक स्वास्थ्यावर परिणाम असेही त्रास उद्भवतात. काही किडनी व क्रोनिक आजारांमध्येही उच्च रक्तदाब हा एक कॉमन घटक आढळून आला आहे. यामुळेच आज आपण तिशीतील व्यक्तीचा रक्तदाब किती असावा याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत ..

उंचीनुसार तुमचे वजन परफेक्ट आहे का? इंच व किलोचं बेस्ट समीकरण जाणून घ्या, पाहा तक्ता

वयोमानानुसार रक्तदाबाचा स्तर कमी जास्त होत असतो. जर का आपण तिशीत असाल तर आपला रक्तदाब हा १२०/८० या गटात असायला हवा. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अन्य आजार नसल्यास तिशीतील व्यक्तीसाठी १४५/९० इतका उच्च रक्तदाबही सामान्य समजला जाऊ शकतो. या वयात सिस्टोलिक रक्तदाब ९५/१३५ व डायस्टोलिक रक्तदाब ६०-८० या रेंजमध्ये असेल.

तिशीत रक्तदाब वाढल्याचे लक्षण

  • रक्तदाब वाढल्यास सतत अंगदुखी व डोकेदुखी जाणवू शकते.
  • उच्च रक्तदाब असल्यास थकवा व कमजोरी जाणवू शकतात.
  • उच्च रक्तदाब असल्यास छातीत अचानक कळ येण्याची शक्यता असते.
  • श्वास घेण्यात अडचणी येऊ शकतात.

युरिक ऍसिड वाढताच हात- पाय, चेहऱ्यावर दिसून येते सूज; ‘ही’ आम्लयुक्त फळं देऊ शकतात आराम

  • अचानक हृदयाची धडधड वाढू शकते व जीव घाबरल्यासारखा होऊ शकतो हे सुद्धा उच्च रक्तदाबाचे लक्षण आहे.
  • उच्च रक्तदाब असल्यास डोळ्याची शक्ती कमी होण्याचा धोका असतो.

थंडीत पोट साफ होत नाही? मुळव्याधाचा त्रास बळावण्याचा धोका; रात्री झोपताना करा ‘हे’ उपाय

  • नाकातून रक्त येणे हे उच्च रक्तदाबाचे संकेत असू शकते.

(टीप: वरील लेख हा माहितीपर असून, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)