तुम्ही कधी अशी परिस्थिती अनुभवली आहे का जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुम्ही कोणासह तरी डेटिंग करत आहात, पण प्रत्यक्षात ते तुमच्यासह डेटिंग करत नाही आहात? तुम्ही डेटवर जाता, छान गप्पा मारता आणि कदाचित एकमेकांच्या जवळ येता पण जेव्हा कमिटमेंट देण्याची वेळ येते तेव्हा तुमचा जोडीदाराला संकोच वाटतो किंवा संभाषण पूर्णपणे टाळतो. तुम्ही असा अनुभव घेत असाल तर तुम्ही देखील ‘पॉकेटिंग रिलेशिप’मध्ये आहात.

पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय? त्यामागील सामान्य कारणे आणि त्याचा सामना कसा करावा याबद्दल अधिक जाणून घेऊ या.

Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Marathwada Socio economic backwardness,
मराठवाड्याच्या अस्वस्थतेची पाळंमुळं
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना

पॉकेटिंग रिलेशनशिप म्हणजे काय?

पॉकेटिंग ही एक डेटिंग संज्ञा आहे जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या जोडीदाराला किंवा त्यांच्या नात्याला त्यांच्या कुटुंबापासून, मित्रांपासून आणि सामाजिक वर्तुळापासून लपवून ठेवते किंवा गुप्त ठेवते तेव्हा अशा नात्याला पॉकेटींग रिलेशनशिप म्हणतात.

पॉकेटिंग रिलेशनशिप करण्यामागील सामान्य कारणे

तुम्ही हे लक्षात घेतले पाहिजे की, पॉकेटिंग हे नेहमीच तुमच्याबद्दलच्या एखाद्याच्या भावनांमुळे निर्माण होत नाही. उदाहरणार्थ, त्यांना तुमच्यासह राहायला आवडत नाही असे नाही. पॉकेटिंग रिलेशनशिपमध्ये अनेक घटक असू शकतात.

नात्याबाबत कमिटमेंट न करणे
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, काहीं व्यक्ती पॉकेटिंग रिलेशनशिपमध्ये अडकतात कारण त्यांचा जोडीदार गंभीर नात्यासाठी असक्षम असतात किंवा त्यांची इच्छा नसते किंवा त्यांचे नाते सर्वांसमोर उघड होईल याची भिती वाटत असते. अशी व्यक्ती जोडीदारासह असण्याचे कौतुक करत असले तरीही, त्यांना त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल इतरांसह चर्चा करणे टाळतात. ते खूप लवकर कमिट करण्याबद्दल आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याबद्दल चिंतीत असू शकतात.

लोक काय म्हणतील याची भिती
रिलेशनशिपबाबत कुटुंब, मित्र आणि ओळखीच्या व्यक्ती काय बोलतील याचा विचार करु नाते लपवणे हे तुमच्या जोडीदाराचे वर्तन देखील असू शकते. त्यांना काळजी वाटू शकते की, जात, धर्म किंवा सामाजिक आर्थिक स्थितीवरील मतभेदांमुळे, त्यांचे प्रियजन त्यांचे नाते स्वीकारणार नाहीत.

ही ‘Dry Dating’ची काय भानगड आहे बुवा? तरुणाईमध्ये एवढा का प्रसिद्ध आहे ट्रेंड, जाणून घ्या

संभाव्य जोडीदाराच्या शोधात असणे
जेव्हा अशा लोकांना इतरांमध्ये स्वारस्य असते किंवा ते दुसरा संभाव्य जोडीदार शोधत असतात तेव्हा तुम्ही पॉकेटिंग रिलेशनशिप अडकले जाता. तुमचा जोडीदार नाते गुप्त ठेवणे हा पर्याय निवडू शकतात कारण त्यांना त्यांच्या इतर जोडीदारांबद्दल जाणून घ्यायचे आहे.

संघर्ष टाळणे

काही व्यक्ती पॉकेटींग रिलेशनशिनमध्ये अडकतात कारण त्यांना जाणीव असते की, त्यांचे नाते उघड केल्याने त्यांच्या कौटुंबिक किंवा सामाजिक वर्तुळात संघर्ष निर्माण होईल. उदाहरणार्थ, एखाद्या वेगळ्या धर्माचे पालन करणार्‍या व्यक्तीशी डेटिंग करत असलेली एखादी व्यक्ती घरातील भांडण टाळण्यासाठी त्यांच्या पालकांना कळू नये असे ठरवू शकते.

नात्याचे नियंत्रण स्वत:कडे ठेवणे

एखाद्याला पॉकेटींग रिलेशनशिमध्ये ठेवणे ही कृती त्यांच्या हातात शक्ती ठेवते, ज्यामुळे ते नात्याला हाताळतात आणि नियंत्रणात ठेवतात. ते त्यांच्या जोडीदारांना स्वतःच्या नियंत्रणात ठेवू शकतात आणि इतरांशी चर्चा करू शकत नाहीत. तज्ञांच्या मते, दुसऱ्या जोडीदारासाठी हा चुकीच्या नात्यात असल्याचा इशारा आहे.

नातेसंबंध : नवरा निर्णय घेऊन मोकळा होतो?

तुम्ही पॉकेटिंग रिलेशनशिपमध्ये अडकले असल्यास काय करावे?

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही पॉकेटिंग रिलेशनशिपमध्ये अडकला असला तर सर्वात आधी तुमच्या जोडीदारासह प्रमाणिकपणे संवाद साधा. जर ते तुम्हाला त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र- मैत्रिणींसह ओळख करुन देण्यास तयार नसतील तर त्याचे कारण विचारा. जर ते नात्याच्या भविष्याबाबत बोलण्यास टाळत असतील तर त्यांना विचारा की ते दुसऱ्या जोडीदाराच्या शोधात आहेत का?

तुम्हाला स्वत:वर देखील बंधणे घालणे देखील महत्त्वाचे आहे. जर तुमचा जोडीदार तुमच्यासह ज्या पद्धतीने वागत आहे हे पटत नसेल तर स्पष्टपणे बोलण्यासाठी घाबरु नका आणि त्यांनाही ते कळू द्या.जर तुमची काळजी लक्षात घेऊ नात्यासाठी बदल्याण्यास तयार नसतील तरी तुम्ही अशा नात्यात राहावे की नाही याबाबत पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे असे समजावे.

Story img Loader