आपण नेहमी सकाळी नाश्ता करतो, पण नाश्ता करण्याची योग्य वेळ कोणती तुम्हाला माहिती आहे का? जर आपण योग्य वेळेत नाश्ता करत नसेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. वेळवर नाश्ता न केल्यामुळे आपली एनर्जी लेव्हल कमी होऊ शकते आणि याच कारणाने आपल्याला दिवसभर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे हेल्दी लाइफस्टाइलसाठी सकाळचा नाश्ता योग्य वेळेत करणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाश्ता करण्याची योग्य वेळ

नाश्ता करण्याची योग्य वेळ सकाळी ७ ते ८च्या दरम्यानची मानली जाते. पण, काही कारणास्तव तुम्ही या वेळेत नाश्ता करू शकला नाही तर सकाळी १० वाजेपर्यंत नाश्ता करावा.
तज्ज्ञांच्या मते, झोपून उठल्यानंतर एका तासाच्या आत नाश्ता करणे गरजेचे आहे. हा बेस्ट टाइम असतो. त्यामुळे तुमची उठायची वेळ कोणती, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्ही उपाशी असता, तेव्हा शरीराला ऊर्जेची अत्यंत आवश्यकता असते. सकाळी शरीरातील ग्लुकोजची मात्रा खूप कमी असते. नाश्ता केल्यानंतर आपली पचनक्रिया ॲक्टिव्ह होते आणि आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते.

हेही वाचा : खिडक्यांच्या काचा वारंवार खराब होतात? फक्त पाच रुपयांत ‘या’ वस्तू वापरून काचा चमकवा नव्यासारख्या

सकाळचा नाश्ता कसा असावा?

सकाळचा नाश्ता हा नेहमी हेल्दी असावा. सकाळी नाश्त्यात फळे, हेल्दी भाज्या आणि फायबरयुक्त अन्नाचे सेवन करावे. तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्स, रवा इडली किंवा डोसा, उपमा, फळे आणि उकडलेली अंडी खाऊ शकता. सकाळचा नाश्ता भरपूर करावा, ज्यामुळे फार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहू शकते.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)