उन्हाळा आला की सर्वात मोठी समस्या उद्भवते ती म्हणजे सनबर्नची. सनबर्न म्हणजे उन्हाच्या तडाख्यामुळे, सूर्याच्या अतिउष्ण किरणांमुळे त्वचा काळी पडणे. अशा वातावरणात काही काळ घराबाहेर पडणेही त्वचेसाठी आपत्ती ठरते. अशा हवामानात, कडक सूर्यप्रकाशात त्वचा खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्वचेवर जळजळ झाल्यामुळे चेहऱ्यावर टॅनिंग दिसू लागते, तसेच त्वचेवर सूज येण्याचा त्रासही होतो. अशा हवामानात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊयात उन्हापासून त्वचेचे संरक्षण कसे करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सनबर्नचे कारण

उन्हाळ्यात १० मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ उन्हात राहिल्याने होणारी सनबर्न ही समस्या आहे. सनबर्नमुळे त्वचेवर लाल डाग दिसतात, त्वचेचा रंग निस्तेज होतो. त्वचेतील आर्द्रता कमी होऊन त्वचा ताणली जाऊ लागते. जर तुम्हालाही उन्हाळ्यात सनबर्न टाळायचे असेल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेचे रक्षण केले पाहिजे, जेणेकरून तुमची या समस्येपासून सुटका होईल.

त्वचा मॉइश्चराइज करा

उन्हाळ्यात सनबर्न टाळण्यासाठी त्वचेवर सनस्क्रीन वापरा. जेव्हाही तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा उच्च एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरा. सनस्क्रीन खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई जास्त आहे.

व्हिटॅमिन डी त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करेल

सनबर्नपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी, व्हिटॅमिन डी असलेले क्रीम वापरा. व्हिटॅमिन डी अतिनील किरणांपासून संरक्षण करते, तसेच त्वचेला चमक आणते.

चेहर्‍याला बर्फ लावा

सनबर्न टाळायचे असेल तर घरी आल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावा. टॉवेलमध्ये बर्फाचा तुकडा घ्या आणि चेहऱ्याला लावा. बर्फाच्या पॅकने मसाज केल्याने त्वचेला होणारी जळजळ कमी होईल. तसेच उन्हामुळे चेहर्‍याला होणारे इतर समस्या देखील कमी होतील.

चेहरा झाकणे

सनबर्न टाळायचे असेल, तर घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या, जेणेकरून चेहऱ्यावरील सूर्यप्रकाश आणि धुळीचा प्रभाव कमी होईल. याने चेहर्‍यावर होणारी जळजळ कमी होईल. तसेच लाल डाग देखील येणार नाही.

उन्हातून परत येताच चेहरा धुवू नका

उन्हाळ्यात जेव्हाही तुम्ही भर कडक उन्हातून घरी येता तेव्हा आल्यानंतर लगेच चेहरा धुवू नका. घरी येताच चेहरा धुतल्याने रक्तवाहिन्यांना तापमानाशी जुळवून घेण्यास वेळ मिळत नाही आणि त्यांचा विस्तार होतो. त्यामुळे त्वचेला सामान्य तापमानात येऊ द्या, नंतर चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर टोनर लावण्याची खात्री करा.

(टीप: वरील टिप्सचा वापर करण्यापुर्वी क्षेत्रातील तज्ञांचा व फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is sunburn and how to treat it know the best tips scsm
Show comments