सध्या वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी अनेक जण आहारात सब्जा, चिया सीड्सचा वापर करत असतात. फळांची स्मूदी, भाज्यांचे सॅलेड, गोडाचे पदार्थ अशा अनेक पदार्थांमध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर केला जातो. मात्र, अनेक जण चिया सीड्स आणि सब्जा हे दोन्ही एकच पदार्थ आहेत असे समजण्याची अगदी साधारण चूक करतात. मात्र, या दोन्ही पदार्थांमध्ये फरक आहे, अशी माहिती इन्स्टाग्रामवरील nutribit.app नावाच्या अकाउंट शेअर केलेल्या एका पोस्टवरून समजते.

तसेच, “चिया सीड्सना त्यांची स्वतःची अशी कोणतीही चव नसते. त्या बिया ज्या पदार्थात घातल्या जातात, त्याची चव त्या घेतात. तर सब्जा या तुळशीच्या बिया असल्याने त्यांना तुळशीची हलकी चव असते”, अशी माहिती आहारतज्ज्ञ पूजा माखिजा यांनी दिल्याचे द इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखानुसार समजते. मात्र, या दोन बियांमध्ये, त्यांच्या पोषक घटकांमध्ये आणि त्यामधून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये काय फरक आहे ते पाहू.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Eknath Shinde C. P. Radhakrishnan devendra fadnavis ajit pawar deepak kesarkar
भाजपासमोर शिंदेंची माघार? मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका; म्हणाले, “शिंदेंनी राजीनामा देणं म्हणजे…”
Solar Ac That Does Cooling at Home Using Sun Energy Cost of Ac for 1 to 1.5 Ton
सोलार एसी वापरून सूर्यावर खेळ रिव्हर्स कार्ड! किंमत, फायदे पाहाच, आधीच घरी एसी असल्यासही करू शकता जुगाड
Viral video of disabled Zomato delivery agent riding a bike to deliver food viral on internet
शेवटी विषय पोटा-पाण्याचा! दोन्ही हात गमावले असूनही स्कूटर चालवत करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून जिद्दीला कराल सलाम
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
hindus atacked in canada
हिंदू भाविकांवरील हल्ला कॅनडा प्रशासनाचं कारस्थान? व्हायरल Video मध्ये महिलेचा टाहो; म्हणाली, “हाच तो”!

चिया सीड्स आणि सब्जामधील फरक [Difference between chia seeds and sabja]

१. चिया सीड्सचा रंग हा साधारण करडा किंवा चॉकलेटी असा असतो, तर सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया या संपूर्ण काळ्या रंगाच्या असतात.

२. चिया सीड्समध्ये ओमेगा-३ हे फॅटी ॲसिड्स, प्रथिने, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, तर सब्जामध्ये फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह असे पोषक घटक असतात. सब्जामध्येही ओमेगा-३ हे फॅटी ॲसिड असते, मात्र त्यांचे प्रमाण कमी असते.

३. चिया सीड्स आणि सब्जामधील सर्वात मोठा फरक म्हणजे दोघांना लागणारे पाणी. चिया सीड्स पाण्यात भिजण्यासाठी भरपूर वेळ घेतात. तसेच चिया सीड्स पाण्यात भिजल्यावर दहापट पाणी शोषून घेतात. मात्र, सब्जा पाण्यात लगेच भिजतात आणि सब्जा पाण्यात भिजल्यानंतर त्यावर पारदर्शक असा एक थर तयार होतो.

४. सौम्य चव असणाऱ्या चिया सीड्स सॅलेड, पुडिंग, शीतपेय यांसारख्या अनेक पदार्थांमध्ये चांगल्या पद्धतीने एकजीव होतात. तसेच तुळशीचा हलका गंध आणि चव असणारा सब्जा हा पदार्थ सरबतांमध्ये अतिशय छान लागतो.

आरोग्यासाठी होणारे फायदे –

चिया सीड्स आपल्या आहारात घेतल्याने, दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तसेच पचनात मदत करून, वजन कमी करण्यासाठीही उपयोगी ठरते. चिया सीड्स आहारात घेतल्याने हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते असे समजते.

तर सब्जाचा आहारात समावेश केल्याने पचनात मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते. तसेच सब्जा हा त्वचेसाठी फायदेशीर असून, तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.

सब्जा आणि चिया सीड्सचे दुष्परिणाम –

सब्जा आणि चिया सीड्सचे अतिप्रमाणात सेवन केल्याने पोट दुखण्याची अथवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकते. तसेच सब्जा व्यवस्थित न भिजवल्यास त्याचाही त्रास पोटाला होऊ शकतो.

सब्जा आणि चिया सीड्सचे सेवन कसे करावे?

चिया सीड्सचा वापर सॅलेड, स्मूदीमध्ये करता येऊ शकतो. तसेच या बियांचा वापर करून अनेक स्वादिष्ट पुडिंग बनवता येऊ शकते.

सब्जा पाण्यात भिजवून लिंबू सरबतात, स्मूदीमध्ये अथवा फालुद्यात वापरता येऊ शकतो.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून @nutribit.app नावाच्या अकाउंटने ही माहिती शेअर केली आहे.