बहुतांश लोकं दही आणि ताक हे एकच गोष्ट समजण्याची चूक करतात. काही लोकं असही समजतात की प्रोबायोटिक ताकचे दुसरे नाव आहे. साधारणपणे असे देखील मानले जाते की ताक हे दहीचे पातळ केलेला प्रकार आहे. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. वास्तविक पाहता या तीन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात, त्यामुळे तिन्ही गोष्टींचे गुणधर्म देखील भिन्न आहेत.
यावेळी शेफ कुणाल कपूर यांनी या तीन गोष्टींमधील फरक स्पष्ट केला आहे. या तीन गोष्टींमध्ये काय फरक आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात.

दही, ताक आणि प्रोबायोटिक मध्ये काय फरक आहे?

दही

दही बनवण्यासाठी आधी दूध गरम केले जाते. यानंतर गरम दूध ३० ते ४० अंशांपर्यंत थंड करून त्यात एक चमचा दही मिसळले जाते. दहीमध्ये आधीच लैक्टिक एसिड आणि बॅक्टेरिया असतात. त्यांना लैक्टोबॅसिलस (lactobacillus) म्हणतात. लैक्टिक एसिडच्या उपस्थितीत जीवाणू कोट्यवधी ट्रिलियनमध्ये गुणाकार करतात. या प्रक्रियेला किण्वन(fermentation) असे म्हणतात. या प्रक्रियेदरम्यान नवीन दही तयार केले जाते. दहीमध्ये जीवाणू असल्याने ते आपल्या पोटात जाते, जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच दहीमध्ये किती जीवाणू असतील, हे दही तयार झाल्यावर समजते. या आधारावर हे ठरवले जाते की दहीमध्ये किती जीवाणू आहेत आणि यापैकी किती चांगले जीवाणू तुम्ही दही खाताना शरीरात जिवंत आतड्यांमध्ये जातात.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
india struggles to meet soybean procurement goals
विश्लेषण : सोयाबीन खरेदीची उद्दिष्टपूर्ती का नाही?
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
Ancient Egypt medicine Serqet goddess
Ancient Egyptian History: ४,१०० वर्षांपूर्वीच्या इजिप्तमधील फॅरोचे उपचार करणाऱ्या डॉक्टरचा शोध लागला; का आहे हा शोध महत्त्वाचा?
climate change creating favorable environment for mosquito borne diseases
वातावरणातील बदलांमुळे साथींचे आजारही बारमाही? हिवताप, डेंग्यू, लेप्टो, इन्फ्लुएन्झाचा धोका सदासर्वकाळ?
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

ताक

ताक बनवण्याची प्रक्रिया जवळजवळ दहीसारखीच असते, परंतु यामध्ये आणखी दोन प्रकारच्या जीवाणूंचे स्ट्रेन करण्याच्या वेळी वेगळे मिसळले जातात. त्यात लैक्टोबॅसिलस बुल्गारिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस (Lactobacillus Bulgaris and Streptococcus Thermophilus) हे बॅक्टेरिया आहेत. या दोन जीवाणूंच्या मिश्रणाने ताकाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही वाढते त्यात हे जिवाणू दहीपासून पूर्णपणे वेगळे होतात. दहीच्या तुलनेत ताकात चांगल्या जीवाणूंची संख्या आणि प्रकार दोन्ही जास्त असतात. ताकाच्या सेवनाने दोन्ही चांगले जीवाणू तुमच्या शरीरात गेल्याने पचनासह अनेक आरोग्य फायदे तुम्हाला मिळतात.

प्रोबायोटिक

जेव्हा तुम्ही प्रोबायोटिक दही म्हणतात तेव्हा ते पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीनुसार बनवले जाते. यामध्ये जीवाणूंचा स्ट्रेन हा जिवंत ठेवावा लागतो आणि अशा पद्धतीने तयार केलेल्या प्रोबायोटिक दहीचे सेवन करतो. अशातच पोटातील जठरासंबंधी आम्ल, पित्त आणि स्वादुपिंडाच्या आम्लाच्या उपस्थितीतही प्रोबायोटिक दहीमध्ये असलेले जीवाणू मरत नाहीत.

प्रोबायोटिक दहीमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया आतड्यांपर्यंत जिवंत पोहोचतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

Story img Loader