Health Benefits of Tofu and Paneer: टोफू हा पनीरचा पर्याय मानला जातो. हे अगदी कॉटेज चीजसारखे दिसतं आणि प्रथिने समृद्ध असतं. वजन कमी करणारे लोक पनीरऐवजी टोफू खाणे पसंत करतात. याचं कारण त्यांना वाटतं की पनीर दुधापासून बनतं, त्यामुळे वजन वाढतं. तर टोफू सोया दुधापासून तयार केला जातो. टोफूमध्ये पनीरपेक्षा कमी फॅट असतं, त्यामुळे वजन कमी करणारे लोक ते खाण्यास प्राधान्य देतात. पनीर आणि टोफूमध्ये अधिक फायदेशीर काय आहे याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणूनच त्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.
फरक काय?
पनीर हे भारतीय खाद्य आहे. दूध फाडून पनीर बनवले जाते. तुम्ही पनीर घरी सहज तयार करू शकता. पनीर टोफूपेक्षा मऊ आणि चवदार असते. जर आपण पोषक तत्वांबद्दल बोललो तर टोफूपेक्षा पनीर अधिक फायदेशीर मानले जाते. पण त्यात टोफूपेक्षा जास्त कॅलरीज असतात.
(हे ही वाचा: मधुमेहींसाठी ‘हे’ फळ आहे खूप फायदेशीर, रक्तातील साखर करते नियंत्रित)
टोफू मूळचा चिनी मानला जातो. टोफू सोया दुधापासून बनवला जातो. हे पनीरसारखे चविष्ट आणि मऊ नसले तरी कमी फॅट आणि कॅलरीजमुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्यांची पहिली पसंती आहे. लैक्टोज इंटोलरेंटने ग्रस्त लोकांसाठी टोफू हा एक चांगला पर्याय आहे.
(हे ही वाचा: Kitchen Hacks: दुधावर घट्ट साय आणण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स)
पनीर अधिक फायदेशीर आहे?
पनीरमध्ये टोफूपेक्षा जास्त प्रोटीन असते. १०० ग्रॅम पनीरमध्ये १४ ग्रॅम प्रोटीन असते, तर १०० ग्रॅम टोफूमध्ये ८ ग्रॅम प्रोटीन असते. कार्बोहायड्रेट्सबद्दल बोलायचे झाल्यास, टोफूमध्ये २.७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात, तर पनीरमध्ये ३.५७ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. पनीरमध्ये ९०एमजी पर्यंत कोलेस्ट्रॉल असू शकते, तर टोफूमध्ये ० टक्के कोलेस्ट्रॉल असते. पण फॅटच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, ते पनीरमध्ये २५ ग्रॅम पनीर आणि टोफूमध्ये ८.७ ग्रॅम असते.
(हे ही वाचा: Health Tips: ‘या’ ५ गोष्टी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका; बिघडू शकते तब्येत)
१०० ग्रॅम पनीरमध्ये ३२१ कॅलरीज असतात, तर १०० ग्रॅम टोफूमध्ये १४४ कॅलरीज असतात. कमी कॅलरी असल्यामुळे, वजन कमी करणारे लोक टोफूला प्राधान्य देतात. टोफूपेक्षा पनीर अधिक स्वादिष्ट आहे. टोफू चवीला हलकासा आंबट असतो. पण पनीर लवकर खराब होते, टोफू पनीरपेक्षा जास्त काळ टिकतो.