जर तुम्ही ब्रेड खरेदी करण्यासाठी दुकानात गेलात तर तुम्हाला विविध पर्याय मिळतात. परंतु, विक्रीसाठी सर्व प्रकारांमधील फरक ओळखणे कठीण असू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला कदाचित अस्पष्ट कल्पना असेल की, होलमील किंवा होलग्रेन ब्रेड आरोग्यदायी आहे. पण, दोन्हीमध्ये नक्की फरक काय आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होलमील ब्रेड म्हणजे काय?

ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या अन्न मानकांनुसार, “होलमील ब्रेड संपूर्ण धान्यापासून बनवले जाते, ज्यामध्ये धान्याचे सर्व भाग असतात. गव्हाचे तीन वेगवेगळे भाग असतात, ते म्हणजे ब्रान (Bran), जम (germ) आणि एंडोस्पर्म (Endosperm). ब्रान हे बाहेरील कठीण आवरण असते ज्याचा नंतर कोंडा होतो, तर जम हा गव्हाचा अंकुरणारा भाग आहे जिथून नव्या रोपाची निर्मिती होते, एंडोस्पर्म हा गव्हामधील सर्वात मोठा भाग आहे, तो मुख्यतः स्टार्चपासून बनलेला असतो. धान्याचे हे सर्व भाग असल्याने होलमील ब्रेड सामान्यतः गडद रंगाचा असतो आणि पांढऱ्या ब्रेडपेक्षा किंचित जास्त तपकिरी असतो. पांढरा ब्रेड हा फक्त एंडोस्पर्म वापरून बनवला जातो आणि तो होलग्रेन आणि होलमीलपेक्षा वेगळा ब्रेडचा प्रकार आहे.

होलग्रेन ब्रेड म्हणजे काय? (How about wholegrain bread?)

ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या अन्न मानकांनुसार होलग्रेन ब्रेड म्हणजे ब्रेडमध्ये एकतर दृश्यमान धान्य असते किंवा ते धान्याचे सर्व भाग असलेल्या पिठापासून बनवले जाते. होलमील ब्रेड ही प्रत्यक्षात एक प्रकारचा होलग्रेन ब्रेड असते – जसे सफरचंद हे एक प्रकारचे फळ असते!

“with added grains”, “grainy” किंवा “multigrain” अशा लेबल वाचून गोंधळून जाऊ नका. ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या अन्न मानकांमध्ये हे परिभाषित केलेले नाही, म्हणून जोपर्यंत एखाद्या उत्पादनाला ‘होलग्रेन ब्रेड असे म्हटले जात नाही किंवा त्यात “संपूर्ण धान्य आहे” असे सूचित केले जात नाही, तोपर्यंत ते अधिक प्रक्रिया केलेल्या घटकांपासून बनवले जाण्याची शक्यता असते.

या संज्ञांचा वापर करणे नियंत्रित करता येत नाहीत, म्हणून उत्पादक पांढऱ्या ब्रेडसाठी थोड्या प्रमाणात ‘होलग्रेन धान्ये’ वापरले आहेत असे लिहितात, जेणेकरून कायदेशीररित्या त्यांचे उत्पादन आरोग्यदायी आहे असे दिसते, म्हणून जोपर्यंत एखाद्या उत्पादनाला विशेषतः ‘wholegrain bread’ असे म्हटले जात नाही किंवा तुम्हाला holegrain किंवा त्यात “contains whole grain” असे सूचित केले जात नाही, तोपर्यंत अधिक प्रक्रिया केलेला घटकांपासून ब्रेड बनवला जाण्याची शक्यता असते.

होलमील किंवा होलग्रेनपैकी कोणता ब्रेड आरोग्यदायी आहे?

होलमील किंवा होलग्रेनपैकी कोणता ब्रेड निवडायचा याचा विचार करताना, दोन्ही ब्रेडमध्ये पोषक तत्वे आणि फायबरसह फायदेशीर संयुगे भरपूर असतात, जे पांढऱ्या ब्रेडसारख्या अधिक शुद्ध केलेल्या पिठापासून बनवलेल्या ब्रेडपेक्षा जास्त असतात.

या संयुगांच्या उपस्थितीमुळे होलमील ब्रेड किंवा होल ग्रेन ब्रेड खाणे आपल्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. संशोधनात असेही दिसून आले आहे की,”होलग्रेन ब्रेड खाल्ल्याने हृदयरोगासारख्या सामान्य दीर्घकाळापासून असलेल्या आजारांचा धोका कमी होतो.

होलग्रेन ब्रेडमध्ये होलमील ब्रेडपेक्षा फायबर, प्रथिने, नियासिन (व्हिटॅमिन बी३), लोह, जस्त, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम किंचित जास्त असते. परंतु, होलग्रेन ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स, थायामिन (व्हिटॅमिन बी१) आणि फोलेट (व्हिटॅमिन बी९) कमी असतात.पण, तुमच्या एकूण आहारात हे कसे योगदान देतात याचा विचार करताना दोन्हीमध्ये फरक तुलनेने कमी असल्याचे लक्षात येते.

मी कोणता ब्रेड खरेदी करावा? (Which one should I buy?)

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ब्रेड खरेदी कराल तेव्हा फायबर आणि प्रथिने आणि एकूण आरोग्याला आधार देण्यासाठी, संपूर्ण धान्याचा ब्रेड (ज्यात धान्य आणि बिया संपूर्ण असतात, अशा संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या ब्रेडचा) तुमच्या पहिल्या पसंतीचा पर्याय म्हणून पाहा. जर तुम्हाला होलग्रेन ब्रेड नसेल, तर होलमील ब्रेड तर ब्रेड खरेदी करू शकता. होलग्रेन आणि होलमील ब्रेडची किंमत साधारणपणे सारखीच असते, परंतु दोन्ही पांढऱ्या ब्रेडपेक्षा जास्त महाग असतात.