Normal range of Cholesterol: कोलेस्टेरॉल शरीरात आढळणारी एक प्रकारची चरबी आहे जी अनेक हार्मोन्स बनवते. कोलेस्टेरॉल शरीरात कॅल्शियम शोषण्यास देखील मदत करते. जर कोलेस्टेरॉलची योग्य मात्र शरीरात नसेल तर आपण जास्त काळ जगू शकणार नाही. कोलेस्टेरॉल शरीरात टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन हार्मोनसह अनेक हार्मोन्स बनवते. याशिवाय ते मेटाबॉलिज्म वाढवण्यास देखील मदत करते. कोलेस्टेरॉल यकृत आणि आतड्याच्या योग्य कार्यासाठी रसायने तयार करते. शरीरात इतकी महत्त्वाची कार्ये करत असतानाही कोलेस्टेरॉल हा काही प्रकारे वाईट समजला जातो.

वास्तविक, कोलेस्टेरॉल हा लिपोप्रोटीन नावाचा चरबीचा प्रकार आहे. लिपोप्रोटीनचे दोन प्रकार आहेत कमी घनता लिपोप्रोटीन किंवा (LDL) आणि उच्च घनता लिपोप्रोटीन किंवा (HDL). शरीरात HDL चे प्रमाण वाढणे चांगले मानले जाते, तर दुसरीकडे, LDL चे प्रमाण वाढणे आपल्या शरीरासाठी खूप वाईट मानले जाते. LDL आपल्या शरीरासाठी वाईट कोलेस्टेरॉल मानले जाते. जेव्हा LDL जास्त असते तेव्हा ते रक्ताच्या धमन्यांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. चला तर मग जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीमध्ये HDL किंवा LDL किती प्रमाणात असावे.

Which Medicine Tablets To Take reduce Acidity First Remedies To Detox Body And Remove Pitta Health Expert Advice
पित्त झाल्यास लगेच कोणती गोळी घ्यावी? डॉक्टरांनी सांगितले, सर्वात आधी घरी काय उपचार करता येईल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Gold-Silver Rate today | gold price gold rate| gold price on 2 September 2024
Gold Silver Price : पोळ्याच्या दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या, आजचे नवे दर
Bigg Boss Marathi arbaz patel and nikki tamboli
‘सिंगल’ नव्हे तर अरबाज पटेल आहे ‘कमिटेड’! ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीसमोर स्वत:च केलं मान्य; ‘तो’ प्रश्न विचारताच म्हणाला…
Maharashtra Kolhapur Mother Saves Son's Life, Attacked With Sword shocking CCTV
VIDEO: कोल्हापुरात आई समोरच मुलावर तलवारीने सपासप वार; पोटच्या गोळ्यासाठी आई हल्लेखोरांना भिडली, शेवटी काय झालं पाहा
What Supriya Sule Said About Ajit Pawar ?
Supriya Sule : ‘अजित पवारांना राखी बांधणार का?’ विचारताच सुप्रिया सुळे हसल्या आणि म्हणाल्या, “मी आज..”
actress Mayoori Kango is Google India head
औरंगाबादमध्ये जन्म, दमदार पदार्पण अन् सुपरहिट सिनेमे करून बॉलीवूड सोडलं; आता गुगलमध्ये उच्च पदावर काम करतेय अभिनेत्री
Pramod Pathak And Shah Rukh Khan
“त्याला सुपरस्टार असण्याचा अहंकार…”, शाहरुख खानबद्दल ‘रईस’मधील सहकलाकाराने केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

( हे ही वाचा: Breast Cancer: खरंच? काळ्या रंगाची ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांकडून सत्य)

माय क्लीव्हलँडक्लिनिक यांच्या माहितीनुसार २० वर्षाखालील लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी वय आणि लिंगानुसार वर किंवा खाली जाऊ शकते. १९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या सामान्य व्यक्तीचे एकूण कोलेस्टेरॉल १७० पेक्षा कमी असावे. त्याच वेळी, अशा व्यक्तीमध्ये नॉन-एचडीएल १२० पेक्षा कमी, एलडीएल ११० पेक्षा कमी आणि एचडीएल ४५ पेक्षा जास्त असायला हवे. परंतु जर व्यक्तीचे वय २० वर्षांपेक्षा जास्त असेल तर एकूण कोलेस्ट्रॉल १२५ ते २०० च्या दरम्यान, नॉन-एचडीएल १२० च्या खाली, एलडीएल १०० च्या खाली असावे. तर HDL ६० किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे.. बाळाच्या जन्माच्या वेळी, मुलापेक्षा मुलीला चांगल्या कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मुलाला ४० पेक्षा जास्त एचडीएल आवश्यक आहे, तर मुलीला ५० पेक्षा जास्त चांगले कोलेस्ट्रॉल आवश्यक आहे. कोलेस्टेरॉलची पातळी प्रति डेसीलिटर मिलीग्राममध्ये मोजली जाते.

कोलेस्टेरॉल केव्हा धोकादायक बनते?

सामान्य व्यक्तीमध्ये, जर एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी २४० किंवा त्याहून अधिक असेल तर ते खूप धोकादायक मानले जाते. जर चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एचडीएल पुरुषांमध्ये ४० पेक्षा कमी आणि महिलांमध्ये ५० पेक्षा कमी असेल तर ते खूप धोकादायक लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, जर एकूण कोलेस्टेरॉलची पातळी २०० ते २३९ च्या दरम्यान असेल तर ते धोकादायक लक्षण आहे. त्याच वेळी, जर LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी १०० ते १५९ च्या दरम्यान असेल, तर समजले पाहिजे की एका रोगाची सुरुवात आहे. जर चांगल्या कोलेस्टेरॉल किंवा एचडीएलची पातळी सामान्य पुरुषांमध्ये ४० ते ४९ आणि महिलांमध्ये ५० ते ५९ दरम्यान असेल तर ते धोकादायक आहे. याचा अर्थ तुम्हाला जास्त धोका आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

( हे ही वाचा: Hair Wash Periods: मासिकपाळी दरम्यान महिला केस धुवू शकतात का? जाणून घ्या तज्ञांनी दिलेली महत्वाची माहिती)

चांगले कोलेस्ट्रॉल कसे वाढवावे

शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक आहे. नियमित व्यायामाने चांगले कोलेस्ट्रॉल वाढवता येते. तळलेले पदार्थ, दारू पिणे हे टाळून देखील चांगले कोलेस्ट्रॉल वाढवता येते. जर चांगले कोलेस्टेरॉल कमी झाले असेल तर डॉक्टर काही औषधांद्वारे ते वाढवण्याचा सल्ला देतात.