विदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. विदेशात जाऊन उत्तम करिअर करण्याची विद्यार्थ्यांची धडपड असते. मात्र आर्थिक घडी व्यवस्थित नसल्याने अनेकांचं स्वप्न भंगतं. मात्र स्कॉलरशिपच्या माध्यमातून शैक्षणिक कर्ज घेत विदेशात शिक्षणासाठी जाता येतं. ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळते. कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास, आपण त्याच्या मदतीने पुढील अभ्यास पूर्ण करू शकता. विद्यार्थ्याने अभ्यास आणि उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाला विद्यार्थी कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज म्हणतात. याच्या मदतीने बँका तुम्हाला शिक्षण घेत असताना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणीत मदत करतात. हे कर्ज तुम्ही कोणत्याही बँक किंवा खासगी संस्थेकडून घेऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दिल्या जाणाऱ्या या कर्जाचा व्याजदर खूपच कमी आहे. तसेच, हप्ते वेळेवर भरल्याने तुमचा CIBIL स्कोर सुधारतो. कमी व्याजावर उपलब्ध असलेल्या या कर्जाच्या मदतीने तुम्ही तुमचे शिक्षणाचे स्वप्न साकार करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार पद्धतीचे शैक्षणिक कर्ज असते

  • करिअर एज्युकेशन लोन – एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी शाळा किंवा कॉलेजमधून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल, तर हे कर्ज मिळू शकते.
  • प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन – जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि तुम्हाला पुढील शिक्षण घ्यायचं असेल. तर यासाठी तुम्ही प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन घेऊ शकता.
  • अंडरग्रॅज्युएट लोन- जर तुम्ही शालेय शिक्षण पूर्ण केले असेल आणि आता विदेशात पुढील शिक्षण पूर्ण करायचे असेल. यासाठी, तुम्ही आर्थिक मदत मिळवण्यासाठी बँकेकडून पदवीपूर्व कर्ज घेऊ शकता.
  • पालक कर्ज – जेव्हा पालक आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.

SBI New Year Offer: खातेदारांना ९.६० टक्के व्याजदरावर पर्सनल लोनची ऑफर; जाणून घ्या प्रोसेस

या कागदपत्रांची आवश्यकता

शैक्षणिक कर्जासाठी तुम्हाला वयाचा पुरावा, गुणपत्रिका, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँकेचे पासबुक, आयडी पुरावा, पत्ता पुरावा आवश्यक आहे. कर्ज ज्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमाचा तपशील देणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच पालक आणि विद्यार्थ्यांचे पॅनकार्ड, आधार कार्ड आणि पालकांचे उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे सोबत ठेवावीत.

असे घ्या शैक्षणिक कर्ज

  • सर्व प्रथम बँक किंवा संस्था निवडा.
  • यानंतर, कर्जाशी संबंधित सर्व आवश्यक माहिती मिळवावी.
  • विविध बँकांद्वारे देऊ केलेल्या व्याजदरांबद्दल जाणून घ्या.
  • बँकेने सांगितलेले सर्व नियम काळजीपूर्वक ऐका.
  • जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत, तेव्हाच तुम्ही कर्ज घेऊ शकता.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the process of eduction loan rmt
Show comments