लहान मुलांची त्वचा मऊ आणि संवेदनशील असते, त्यामुळे मुलांच्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे प्रोडक्ट मिळतात. पण लहान मुलांनी स्किन केअर रूटीन केव्हा सुरू करावे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जाणून घेऊयात लहान मुलांनी स्किन केअर रूटीन सुरु करायचं योग्य वय कोणतंय..
लहान मुलांच्या त्वचेसाठी स्किन केअर रूटीन हे लहानपणापासून सुरु करावे. त्यांना स्कीन केअर प्रोडक्टही वापरु शकतो. मात्र त्यापूर्वी त्याचे परिणाम जाणून घेतले पाहिजेत. बॉडी लोशन आणि विशेषत:लहान मुलांसाठी तयार केलेले शॅम्पू यासारखी उत्पादनांचा आपण वापर करु शकतो. १०-११ वर्षांची मुले बाहेर भरपूर खेळतात, अशावेळी त्यांची स्कीन टॅन पडते यावेळी त्यांना बॉडीलोशन लावू शकतो मात्र ते सौम्य असावे कारण त्यांची त्वचा अजूनही संवेदनशील आहे.
तारुण्यवस्थेत प्रवेश –
१२-१३ व्या वयात लहान मुलांच्या शरिरात अनेक बदल घडत असतात. मुलं तारुण्यवस्थेत प्रवेश करत असताना हारमोन्समध्ये बदल होते, शरिरात बदल होत असतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल येणे, जास्त घाम येणे असे प्रकार होत असतात. यावेळी तुमच्या मुलांच्या काही सवयी बदलल्या पाहिजेत असं डॉक्टर वंदना पुजारी सांगतात. मुलांनी वरच्यावर चेहरा धुतला पाहिजे. चेहरा तेलकट राहिल्यानं पिंपल्स येण्याची शक्यता असते. १२-१३ वर्षांच्या मुलांनी सनस्क्रीन लावायला सुरुवात करावी.
मॉइश्चरायझर क्रीम, अँटीडँड्रफ शाम्पू –
चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर क्रीम करण्याची सवय लावा. मॉइश्चरायझर क्रीम तेलकट आणि कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते. केसात वारंवार कोंडा होत असेल तर अँटीडँड्रफ शाम्पू वापरायला हवा. कोंडा खूप जास्त प्रमाणात असेल तर जवळपास एक महिना अँटी डँड्रफ शाम्पू वापरून पाहा. तुम्ही गरज वाटल्यास एकापेक्षा जास्त शाम्पूही वापरून पाहू शकता. त्यामुळं तुमच्यासाठी कोणता शाम्पू अधिक योग्य आहे, हे तुमच्या लक्षात येईल.खालील केमिकल असलेले शाम्पू कोंडा रोखण्यासाठी खरेदी करू शकता.
- झिंक पायरीथियोन
- सॅलिसिलिक अॅसिड
- सेलेनियम सल्फाईड
- किटोकोनाझोल
- कोल टार
दरम्यान स्कीनसंदर्भात जर कोणतीच उत्पादने वापरुन फरक पडत नसेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.