कलिंगड हे एक फळ आहे जे भारतात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. रसाळ आणि गोड कलिंगडच्या फोडी उन्हाळ्यात गरमीपासून आराम देतात आणि या लाल फळाचा थंड ज्युस वेगळचं सुख देतो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, हे फळ खाण्याचे फायदे आणि तोटेही आहेत. एवढेच नाही तर कलिंगड खाताना हेही लक्षात ठेवले पाहिजे की कलिंगड कधी खावे? किंवा खाण्याची नक्की कोणती योग्य वेळ आहे. होय, अशा काही परिस्थिती आणि वेळा असतात जेव्हा कलिंगड खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते.
कलिंगड खाण्याचे फायदे
कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीराला हायड्रेट करण्याचे काम करते. हे शरीराचे उष्णता आणि उष्णतेपासून संरक्षण करते.
(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचा चहा प्यावा का? योग्य उत्तर जाणून घ्या)
कधी खाऊ नये कलिंगड?
कलिंगड रात्री खाल्ल्याने पचत नाहीत. त्यामुळे आतड्यांचा त्रास होऊ शकतो. कारण आपली पचनसंस्था दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त सुस्त असते. त्यामुळे रात्री कलिंगड खाल्ल्याने अपचन होऊ शकते.
(हे ही वाचा: Amazon फ्रेश कडून मँगो महोत्सवची घोषणा! २-३ तासात मिळणार घरपोच डिलेव्हरी)
मधुमेहांच्या रुग्णांसाठी
जरी कमी-कॅलरी अन्न असल्याने, वजन कमी करण्यासाठी कलिंगड खाण्याची शिफारस केली जाते. पण, त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मधुमेहींनी कलिंगडचे सेवन कमी करावे.
(हे ही वाचा: Home Remedies: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी करा ‘हे’ ५ घरगुती प्रभावी उपाय!)
होऊ शकते किडनीचे नुकसान
कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून, ते लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करते. याचे सेवन केल्याने वारंवार लघवी होते. त्याचप्रमाणे कलिंगड आपल्या शरीरात भरपूर पाणी पोहोचते. त्यामुळे ओव्हर हायड्रेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शरीरातील हे अतिरिक्त पाणी किडनी कमकुवत करते.